नित्योपासना - गुरुवार - सायंस्मरण
ॐ नम: शिवाय परमपूज्य आई श्रीकलावतीदेवी भजन - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ॥ १) मज मोरयाचा बहुत लागला छंद बाय ॥धृ०॥ एक घडी पळ विसरु पडेना । नवल मी आता सांगु काय ॥१॥ असता संसारी सहज उदास । लाधला मोरयाचा पाय ॥२॥ गोसावीनंदन स्वामी परात्पर । सुखमय सर्वांठाय ॥३॥ भजन - पार्वतीच्या नंदना मोरया, गजानना गजवदना ॥ २) श्रीगुरुकृपाअंबे जय जय जय जगदंब आई ॥धृ०॥ तनमनधन हे अर्पुनि चरणी । शरण मी आलो दीन होउनि । नाम तुझे मम वदनी देउनि । ठेवी पायी । माते ॥१॥ नाम तुझे करी पतितां पावन । कलियुगी नाही त्या समान । न करिता व्रत तीर्थे दान । मोक्ष देई । माते ॥२॥ आजवरि रक्षिले बहु भक्तांसी । नासुनि त्यांच्या पापराशी । दिधले सुखसाम्राज्यपदासी । वर्णु म्या कायी । ...