Posts

Showing posts with the label सोमवार सायं स्मरण

नित्योपासना - सोमवार - सायं स्मरण

Image
ॐ नम: शिवाय परमपूज्य आई श्रीकलावतीदेवी   भजन - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ॥ १) श्रीशिवगौरीप्रियनंदना । पूर्ण करीं मनकामना ॥धृ०॥ चौदेहाच्या चौरंगी बसवुनि । पूजिन तुज विघ्नविनाशना ॥१॥ अनन्यभक्तिजले स्नान घालुनि । चरणी वाहीन सुमना ॥२॥ वासनाशेंदूर अंगा लावीन । धूप अहंभावना ॥३॥ रजोगुणात्मक लाल पीतांबर । नेसविन मूषकवाहना ॥४॥ पंचविषय ह्या दूर्वा तुज म्या । अर्पिन सुरनरवंदना ॥५॥ नंदादीप अखंड ध्यानाचा । कर्पूर समूळ दुर्भावना ॥६॥ सुप्रेमाचा मोदक भक्षी । सत्वरि कलिमलदहना ॥७॥ भजन - पार्वतीच्या नंदना मोरया, गजानना गजवदना ॥ २) सुंदरे गुणमंदिरे करुणाकरे कमलोदभवे । सिध्दचारणपूजिते जनवंदिते महावैष्णवे । त्राहि वो मज, त्राहि वो मज पाहि वो महालक्षुमी । हेम...