नित्योपासना - शुक्रवार - सायंस्मरण
ॐ नम: शिवाय परमपूज्य आई श्रीकलावतीदेवी भजन - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ॥ १) मोरेश्वर माउली । प्रेमळ ॥धृ०॥ अनन्य जे नर शरण रिघाले । तयालागी पावली ॥१॥ स्मरणमात्रे संकट हरुनि । दे शांतीची साउली ॥२॥ कलिमलहरण त्वरे कराया । कळवळुनि धावली ॥३॥ भजन - पार्वतीच्या नंदना मोरया, गजानना गजवदना ॥ २) गुरुकृपाअंबे जय जगदंबे । प्रीतिकदंबे सारासार नितंबे ॥धृ०॥ गुरुकृपा परमेश्वरी, जयाते हाती धरी । अनंत तयाच्या होती सुदंर लहरी ॥१॥ गुरुकृपा तीच भक्ति, गुरुकृपा तीच शक्ति । गुरुकृपा परिपूर्ण शांति विरक्ति ॥२॥ गुरुकृपा आदिमाता, धन्य ज्या आली हातां । गुरुकृपेविण जन्म वायाचि जाता ॥३॥ गुरुकृपेविण वावो, देवीसहित देवो । गुरुकृपा जाहलिया नाहीच भेवो ॥४॥ श्रीगीताभागवत, गुरुकृपा भावत ।...