नित्योपासना - शुक्रवार - सायंस्मरण

ॐ नम: शिवाय
param pujya kalavati aai nityopasana,gondavalekar maharaj,gondavale,brahmachaitanya,maharaj,meditation,nityanustaana,upasana,balopasana,marathi upasana,nirupan,gondavlekar,gondavalekar,dainandin upasana,balopasana marathi,chaitanya,hindi,kalawati mata balopasana,kirtan,shri tatyasaheb ketkar,marathi,how to do pranayama,total stress management,nilesh jadhav,sanskaar,bramhopadesha,punyatithi utsav,brahma chaitanya,upanayanam,padhye kaka,india

परमपूज्य आई श्रीकलावतीदेवी  

भजन - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ॥

१) मोरेश्वर माउली । प्रेमळ ॥धृ०॥
अनन्य जे नर शरण रिघाले । तयालागी पावली ॥१॥
स्मरणमात्रे संकट हरुनि । दे शांतीची साउली ॥२॥
कलिमलहरण त्वरे कराया । कळवळुनि धावली ॥३॥

भजन - पार्वतीच्या नंदना मोरया, गजानना गजवदना ॥

२) गुरुकृपाअंबे जय जगदंबे । प्रीतिकदंबे सारासार नितंबे ॥धृ०॥
गुरुकृपा परमेश्वरी, जयाते हाती धरी । अनंत तयाच्या होती सुदंर लहरी ॥१॥
गुरुकृपा तीच भक्ति, गुरुकृपा तीच शक्ति । गुरुकृपा परिपूर्ण शांति विरक्ति ॥२॥
गुरुकृपा आदिमाता, धन्य ज्या आली हातां । गुरुकृपेविण जन्म वायाचि जाता ॥३॥
गुरुकृपेविण वावो, देवीसहित देवो । गुरुकृपा जाहलिया नाहीच भेवो ॥४॥
श्रीगीताभागवत, गुरुकृपा भावत । श्रीरमावल्लभदास महावाक्य पावत ॥५॥

भजन - आनंदे गुरुमाय । निजानंदे गुरुमाय । सच्चिदानंदे गुरुमाय । पूर्णानंदे गुरुमाय ॥

३) सदगुरु माझे, जीवींचे जीवन । तयाविण आन, नेणे मी हो ॥१॥
सदगुरु माझी, प्रेमळ माउली । कृपेची साउली, वर्णू काय ॥२॥
सदगुरुनी प्रेमपय पाजविले । भजनी गोविले सर्व काळ ॥३॥
सदगुरुनी मज आशीर्वाद दिल्हा । तेणे हरुष भरला, ह्रदयी माझ्या ॥४॥
सदगुरुनी माझ्या शिरी ठेविला करु । आठव ना विसरु, ऐसे झाले ॥५॥
सदगुरुकृपे, तरलो तरलो । आता मी न उरलो, दुजेपणे ॥६॥
अनाथांचा नाथ, पतितपावन । कलिमलदहन, सदगुरु माझा ॥७॥

भजन - शांत किती हा सदगुरुमूर्ति । पाहता मावळे द्वैतभ्रांति ॥

४) जगतमे एक सार है धरम, धरम, धरम । करो परोपकारके करम, करम करम ॥धृ०॥
मानुषकी देह पायके हरिनाम नही लिया । भीरता जनम गमा दिया शरम, शरम, शरम ॥१॥
तेरे शरीरमे है दिव्य ज्योत इशकी । गुरुके वचनसे समज ले मरम, मरम, मरम ॥२॥
दुनियाकी सभी वस्तु नाशिवान स्थिर नही । सपने समान देखिले भरम, भरम, भरम ॥३॥
व्यापक है सभी वस्तुमे परब्रह्म जान ले । ब्रह्मानंद मिले मोक्षपद परम, परम, परम ॥४॥

भजन - सीताराम जय जय राम । हरेराम, राम, राम, राम ॥

५) पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग दैवत माझे । अखंड माझ्या ह्रदयी विराजे ॥धृ०॥
पंढरीत भीमातटनिकटी । उभय कराते ठेवुनि कटी ।
पुंडलिकास्तव उभा विटेवरती । भाविक लोकां दर्शन सहजे ॥१॥
पीतपीतांबर कंठी तुलसीहार । कर्णी कुंडले मकराकार ।
मस्तकी मुकुट शोभे मनोहर । भाळी कस्तुरी टिळा साजे ॥२॥
दीन अनाथ जन असंतुष्टि । त्यावरी करितो कृपावृष्टि ।
निशिदिनी ध्याता ह्रदयसंपुष्टि । घे भक्तांचे मीपण ओझे ॥३॥
आषाढी कार्तिकी भरते यात्रा । भावे पूजिति राजीवनेत्रा ।
आनंद न समाये सत्पात्रा । तहान भूक काही न सुचे ॥४॥
वाळुवंटी संत सज्जन जमती । विठ्ठल नामाचा गजर करिती ।
भजनी कीर्तनी रंगुनि जाती । वीणा टाळ मृदंग वाजे ॥५॥
जमुनि उदंड संतमेळा । करिती बहु उत्साहे सोहळा
भक्तराज रुक्मिणीपति सांवळा । अति आनंदे थै थै नाचे ॥६॥

भजन - उपेंद्रा भक्तचकोरचंद्रा । सत्वरि धाव बा ॥

६) घे गुरुबोध घुटका रे, प्राण्या ॥धृ०॥
सदगुरुवाचुनि या भवसागरी । कोण करील सुटका रे ॥१॥
क्षणभंगुर तनु मानिसी अमर । काळ क्षणात करि मुटका रे ॥२॥
धनसुतदारा मानिसी आपुले । त्यांचा मोह लटका रे ॥३॥
येता उघडा जाता उघडा संगे च ये मणि फुटका रे ॥४॥
धनासाठी तुज आप्तसोयरे । मानिति काळजाचा कुटका रे ॥५॥
कलिमलहरणगुरुबोधी रमता । गेला अहं मम झटका रे ॥६॥

भजन - ॐ नमःशिवाय, तरणोपाय,
सुलभ उपाय, तारकमंत्र गुरुंचा ॥

७) भक्तिरसायन बडा जी होवे भवरोगनका झाडा ॥धृ०॥
श्रवण परिक्षिती कीर्तन नारद स्मरण करे प्रल्हादा ।
पगसेवन लछुमीसे हुवा हरिचरण चित्त जडा ॥१॥
अरचन किया पृथुराजने वंदन अक्रूर किया ।
दास्य किया जो हनुमानजीने निशिदिन आगे खडा ॥२॥
सख्यभक्ति अरजुनने पाई बली निवेदन किया ।
तन मन धनहि सब दे डारा, हात जोडकर खडा ॥३॥
भक्ति करेगा जो भवरोगी मुक्ति उनकी दासी ।
पोथी पुरान कुरान देखे दुजा मार्ग नही बडा ॥४॥
भक्तिबिना कोई तरन न जावे सब शास्तरमो देखा ।
दुजा उपाव नही जानके कबीर भक्ति नही छोडा ॥५॥
काय वानु मी या, संतांचे उपकार ।
मज निरंतर, जागविती ॥१॥
काय द्यावे यांसी, व्हावे उतराई ।
ठेविता हा पायी, जीव थोडा ॥२॥
सहज बोलणे, हित -उपदेश ।
करुनि सायास, शिकविती ॥३॥
तुका म्हणे वत्स, धेनुवेच्या चित्ती ।
तैसे मज येती, सांभाळीत ॥४॥

भजन - सदगुरुमाय दाखवि पाय । तुजविण गमेना करु मी काय ॥

आरती

१) जय जय जय ॐ कारे, माते । आरती ओवाळीतो करुणासागरे, माते ॥धृ०॥
नवरत्नांकित सिंहासनी बैसुनि सदगुरु सुंदरे, माते । षडविकार शमवुनि पाप ताप हरे, माते ॥१॥
सुकुमार पदावरी पुष्प सुवासिक पहाता चित्त विरे, माते । सुहास्यवदन पहाता, भवदुःख विसरे, माते ॥२॥
तव बोधामृतपाने भेदाभेद काही नुरे, माते । अगम्य महिमा तुझा, सुरवरां अगोचरे, माते ॥३॥
तव नामामृत सेवन करिता अतृप्ति सरे, माते । तव प्रेमामृत मिळता, देहभान विसरे, माते ॥४॥
भक्तिविण तव लाघव कोणा न कळे सदगुणमंदिरे, माते । कलिमलदहन करोनि, सुखविसि अभयकरे, माते ॥५॥

२) आरती गुरुमाई । मस्तक ठेविते पायी ॥धृ०॥
कलियुगी अवतरोनी । श्रीहरिमंदिरात ।
कलावती या नामे । प्रगटलीस आई ॥१॥
गौरवर्ण काया । सुहास्यवदन ।
शांत मूर्ति पाहता ।मन तल्लीन होई ॥२॥
चतुर्विध भक्त येती । त्यावरि समान प्रीति ।
अज्ञान निरसुनिया । देसी आनंद आई ॥३॥
भवताप निवारोनी । सुखविसी सकला ।
म्हणुनि दीन विजया । शरण आली असे पायी॥४॥

घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रुप तुझे ।
प्रेमे आलिंगीन, आनंदे पूजीन, भावे ओवाळीन म्हणे नामा ॥१॥

त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुध्द्यात्मना वा प्रकृतिस्वभावात।
करोमि यद्यत सकलं परस्म, नारायणायेति समर्पयामि ॥३॥

ॐ चैतन्यं शाश्वतं शांतं व्योमातीतं निरंजनम ।
नादबिंदुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः । गुरवे नमः । गुरवे नमः ॥

गुरुपादुकाष्टक

दयावंत कृपावंत सद्गुरुराया | अनन्यभावे शरण आलो मी पाया | भवभ्रमातुनि काढी त्वरे या दीनासी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |१|
अनंत अपराधी मी सत्य आहे | म्हणोनि तुझा दास होऊ इच्छिताहे | तुजविण हे दुःख सांगू कुणासी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |२|
मतिहीन परदेशी मी एक आहे | तुजविण जगी कोणी प्रेमे न पाहे | जननी जनक इष्ट बंधु तू मजसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |३|
जगतपसारा दिसो सर्व वाव | अखंडीत तव पायी मज देई ठाव | विषापरि विषय वाटो मनासी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |४|
तव आज्ञेसी पाळील जो एकभावे | तयासीच तू भेट देसी स्वभावे | म्हणोनि अनन्यशरण आलो मी तुजसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |५|
किती दिवस गाऊ हे संसारगाणे | तुजविण कोण हे चुकविल पेणे | नको दूर लोटू चरणी थारा दे मजसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |६|
सुवार्णासी सोडुनी कांति न राही | सुमनासी न सोडी सुवास पाही| तैसा मी राहीन निरंतर तुझ्या सेवेसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |७|
कलावंत भगवंत अनंत देवा | मनकामना पुरवि दे अखंड तव भक्तिमेवा | कृपा करोनि मज ठेवी स्वदेशी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |८|

सोमवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु ...

सोमवार - सायंकाल स्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...

मंगलवार - प्रातः स्मरण - उठा उठा हो वेगेसी ...

मंगलवार - सायंस्मरण - श्री गणपते | विघ्ननाशना ...

बुधवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागर ...

बुधवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ...

गुरुवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति कर ...

गुरुवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...

शुक्रवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...

शनिवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...

शनिवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...

रविवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...

रविवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...

Comments

Popular posts from this blog

बालोपासना

नित्योपासना - सोमवार - प्रातः स्मरण

नित्योपासना - मंगलवार - प्रातः स्मरण