नित्योपासना - सोमवार - प्रातः स्मरण

ॐ नम: शिवाय
param pujya kalavati aai nityopasana,gondavalekar maharaj,gondavale,brahmachaitanya,maharaj,meditation,nityanustaana,upasana,balopasana,marathi upasana,nirupan,gondavlekar,gondavalekar,dainandin upasana,balopasana marathi,chaitanya,hindi,kalawati mata balopasana,kirtan,shri tatyasaheb ketkar,marathi,how to do pranayama,total stress management,nilesh jadhav,sanskaar,bramhopadesha,punyatithi utsav,brahma chaitanya,upanayanam,padhye kaka,india

परमपूज्य आई श्रीकलावतीदेवी  

प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा | अज्ञानत्व हरोनि बुध्दि मति दे आराध्य मोरेश्वरा ||
चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी | हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी ||१||

नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे | माथा शेंदूर पाझरे वरि बरे दूर्वांकुराचे तुरे ||
माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे | गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ||२||

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते |
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते |
ॐ शांतिः शांतिः शांतिः ||

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः | गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ||

ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम | द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम ||
एक नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं | भावातीतं त्रिगुणरहितं सदगुरुं तं नमामि ||

तव भक्तिलागी तनु ही झिजू दे | तव चरणकमली मन हे निजू दे ||
तव भजनी ठेवी ही वाचा रिझाया | नमस्कार माझा तुला गुरुराया ||

१) धन्य श्रीहरिमंदिर | आमुचे धन्य श्रीहरिमंदिर ||धृ||
सर्वतोमुखी एकचि चाले | हरिनामाचा गजर ||१||
भूलोकीचा स्वर्ग असे हा | दुःख नसे तिळभर ||२||
बद्धजीवांचे त्रिताप निववुनि | देई सदैव आधार ||३||
मुमुक्षूते निजबोध देई | व्हावया भवनदीपार ||४||
साधका सुलभ साधन दावी | दे शांति सत्वर ||५||
शरणागतांसी ब्रह्मोपदेशे | जाणविते अमर ||६||
ज्यापासुनि मी सुखी जाहले | असो विजय निरंतर ||७||

भजन - गुरुराया मजवरी करी करुणा | तुजविण शरण मी जाऊ कुणा ||

२) उठा उठा हो भाविकजन, गंगेमाजी करा स्नान | विश्वनाथाचे घ्या दर्शन, त्रिविधताप निवतील ||१||
स्मरता सदाशिव मायबाप, जाय चित्ताचा संताप | आनंद होय अमूप, विघ्नसंकटे हरतील ||२||
कृष्णा, वेण्या, तुंगा, नर्मदा, भीमा, तापी, शरयू, गोदा | येती शिवदर्शना सदा, त्या पावन करतील ||३||
भोगा, यमुना, सरस्वती, घटप्रभा, नेत्रावती | सांबदर्शनासी येती, तुम्हा सहज भेटतील ||४||
पाहोनि माध्यान्हसमय, स्नाना ये गुरु दत्तात्रय | हर्षे डोले गंगामाय, कलिमल दूर होय म्हणुनि ||५||

भजन - गुरुवरा सदगुरुवरा, येउंदे करुणा तुला रे मायबाप ||

३)हरिभजना विस्मरलो रे | देहसुखा अनुसरलो रे |
धनसुतदारा मोहित होउनि | अविचारे बहु रडलो रे ||१||
त्रिविधतापे पोळलो रे | सुपथ न मिळता गळलो रे |
बहु जन्मीचे पुण्य फळले | सदगुरुचरणी लोळलो रे ||२||
प्रेमामृते भिजलो रे | दैवी गुणांनी सजलो रे |
कनवाळु सदगुरुमायकृपेने | आनंदसेवनी धजलो रे ||३||
गुरुपदाची जोड रे | पुरवी जीवीचे कोड रे |
कलिमलदहनसदगुरुस्मरणे | शेवट झाला गोड रे ||४||

भजन - मजला उध्दरि सदगुरुनाथा श्रीगुरुनाथा, तू मायबाप दीनांचा ||

४) तू दयाळु दीन हौ तू दानी मै भिकारी | हौ प्रसिध्द पातकी तू पापपुंजहारी ||१||
नाथ तू अनाथ को अनाथ कौन मोसो | मो समान आरत नही आरत हर तो सो ||२||
ब्रह्म तू हौ जीव हूं ठाकूर हौ चेरो | तात मात गुरु सखा तू सब विधि हित मेरो ||३||
तोहि मोहि नातो अनेक मानिले जो भावे | जो त्यो तुलसी कृपाल चरण शरण पावे||४||

भजन - जगदीशा, जय जय पुराणपुरुषा | सदगुरु धाव बा ||

५) भेटेना गुरु भेटेना | सखी |धृ०|
तनधनगृहदारासुतविषयी | मन कदापि विटेना ||१||
त्रिविधतापे पोळलो भारी | लोटता काळ लोटेना ||२||
मार्ग दिसेना चैन पडेना | आशापाश तुटेना ||३||
काय करु मी कोणा सांगू | दुःख पोटी साठेना ||४||
बोध मिळेना दुःख टळेना | घोर भवांबुधि आटेना ||५||
कलिमलदहन गुरुबोधाविण | भवभ्रमपट फाटेना ||६||

भजन - श्रीकृष्ण चैतन्यप्रभु नित्यानंदा | हरेराम हरेकृष्ण राधेगोविंदा ||

६) संतमांदी जाउनि मिळू | सगुण अगुण हरिमय जे झाले, त्यांच्या पायी लोळू |धृ०|
हरिभक्तीचे तेज फाकते, अंगी चितसुख - कळा चमकते |
त्या पाहुनि निजशांति लाजत, त्यांच्या पायी लोळू ||१||
जिकडे जाई त्यांची दृष्टि, तिकडे होई कृपामृतवृष्टि |
ज्यांच्या वचने तुष्टी पुष्टी, त्यांच्या पायी लोळू ||२||
शांतिमंदिरी सदा क्रीडती, अज्ञजनांसी ते जागविती नाही मानाची ज्या प्रीति , त्यांच्या पायी लोळू ||३||
ऐसे जे ते साधुसंत, अखंड प्रेम मूर्तिमंत |
दीनांचे हितकारी आप्त, त्यांच्या पायी लोळू ||४||
राया रंकावरी सम प्रेम, हाचि ज्यांचा प्रेमोद्यम |
कृष्णदासाचे सुखधाम, त्यांच्या पायी लोळू ||५||

भजन - तुमबिन गुरुजी मै निराधार | अनाथ को मुझे देवोजी आधार ||

७) गुरुबिन कौन बतावे बाट | बडा बिकट यमघाट ||१||
भ्रांति की बाडी नदियां बिचमो | अहंकारकी लाट ||२||
मदमत्सरकी धार बरसत | मायापवन घनदाट ||३||
कामक्रोध दो पर्बत ठाडे | लोभचोर संगात ||४||
कहत कबीर सुन मेरे गुनिया क्यौं करना बोभाट ||५||

भजन - सच्चिदानंद कृष्ण सच्चिदानंद ||

८) श्रीसंतांचिया माथा, चरणावरी माझा | देही भाव दुजा, नाही नाही ||१||
नामाचे चिंतन, करिती सर्व काळ | ते माझे केवळ, मायबाप ||२||
मायबाप म्हणो, तरी लाजिरवाणे | चुकविले पेणे, संतजनी ||३||
ज्या ज्या जन्मा यावे, मायबापे दोन्ही | परि संत निर्वाणी, मिळती ना ||४||
येचि देही डोळां, संतांसी देखिले | एकाजनार्दनी वंदिले, चरण त्यांचे ||५||

भजन - चला चला रे सर्व मिळोनि श्रीहरिमंदिरी जाऊ, तेथे हरिनाम घेऊ | माळ हरिगळां वाहू ||

९) शेवट गोड करी | गुरुराया ||धृ०|| पंचविषयी आसक्त होउनि | बनलो मी अविचारी ||१||
अनन्यभक्ति दान देउनि | करी मज सुविचारी ||२||
तवपदकमलामोद सेवुनि | राहीन निरंतरी ||३||
कलिमलदहना पदरी घे दीना | तूचि माझा कैवारी ||४||

भजन - महाराज सिध्दारुढ माउली ||

आरती

१) काकड आरती माझ्या प्रेमळ सिध्दा ओवाळू | अनन्यभावे शरण जाउनि आज्ञेसी पाळू ||धृ०||
तुजविण कोणी न वाली म्हणुनि तत्पायी लोळू | गुरुचरणाच्या बळकट ध्यासे विघ्नाते टाळू ||१||
ओल नाही ते फोल बोलणे क्षणोक्षणी गाळू | गुरुगुण सुंदर गीत सदोदित ह्रदयात घोळू ||२||
सदभाव सदभक्तिचा अरि दुःसंग वगळू | सदा गुरुभजनी रत होउनि निंदास्तुति गिळू ||३||
अहर्निशी गुरुबोधश्रवणे द्वैतभाव कोळू | कलिमलदहनकृपामृत पिउनि निजानंदे डोलू ||४||

२) ओवाळू आरती माता कलावती | पहाता तुझी मूर्ति मनकामनापूर्ति ||धृ०||
भावे वंदिता तव दिव्य पाउले | संसारापासुनि माझे मन भंगले ||
तुझ्या भजनी नित चित्त रंगले | झाली ह्रत्तापाची पूर्ण शांति ||१||
गौरवर्ण तनुवरि शोभे शुभ्र अंबर | दर्शनमात्रे लाभे आनंद थोर ||
भाषणे सकल संशय जाती दूर | विशालाक्ष मज दे गुणवंती ||२||

घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रुप तुझे |
प्रेमे आलिंगीन, आनंदे पूजीन, भावे ओवाळीन म्हणे नामा ||१||

त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव |
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव ||२||
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुध्द्यात्मना वा प्रकृतिस्वभावात |
करोमि यद्यत सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि||३||

नमोऽस अनंताय, सहस्त्रमूर्तये, सहस्त्रपादाक्षशिरोरुबाहवे,
सहस्त्रनाम्ने पुरुषाय शाश्वते, सहस्त्रकोटीयुगधारणे नमः ||

विज्ञापना

हे विश्वजनका, विश्वंभरा, विश्वपालका, विश्वेश्वरा !
माझ्या मनाची चंचलता दूर कर.

हे सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वोत्तमा, सर्वज्ञा !
तुला ओळखण्याचे मला ज्ञान दे .

हे प्रेमसागरा, प्रेमानंदा, प्रेममूर्ते, प्रेमरूपा !
माझे दुर्गुण नाहीसे करून शुद्ध प्रेमाने हृदय भरू दे.

हे ज्ञानेशा, ज्ञानमुर्ते, ज्ञानांजना, ज्ञानज्योति !
तुझ्या चरणी माझी श्रद्धा, भक्ती द्रुढ कर.

हे मायातीता, मायबापा, मायाचालका, मायामोहहरणा !
समदृष्टी आणि अढळ शांति मला दे .

हे कमलनयना, कमलाकांता, कमलानाथा, कमलाधीशा !
माझ्या नेत्रांना सर्व स्थावर-जंगमात तुझे दर्शन घडू दे .
माझे कान तुझे कीर्तन श्रवण करू देत.

हे पतितपावना, परमेशा, परमानंदा, परमप्रिया !
माझ्या हस्ताने तुझी पूजा घडू दे.
तुझ्याभोवती माझे पाय प्रदक्षिणा घालू देत.

हे गुरुनाथा, गुरुमूर्ते, गुरुराजा, गुरुदेवा !
माझे मन निरंतर तुझे ध्यान करू दे.
तुझ्या चरणकमली मला अखंड थारा दे.

सोमवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...

मंगलवार - प्रातः स्मरण - उठा उठा हो वेगेसी ...

मंगलवार - सायंस्मरण - श्री गणपते | विघ्ननाशना ...

बुधवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागर ...

बुधवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ...

गुरुवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति कर ...

गुरुवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...

शुक्रवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...

शुक्रवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...

शनिवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...

शनिवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...

रविवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...

रविवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...

Comments

Popular posts from this blog

बालोपासना

नित्योपासना - मंगलवार - प्रातः स्मरण