नित्योपासना - शनिवार - सायंस्मरण

ॐ नम: शिवाय
param pujya kalavati aai nityopasana,gondavalekar maharaj,gondavale,brahmachaitanya,maharaj,meditation,nityanustaana,upasana,balopasana,marathi upasana,nirupan,gondavlekar,gondavalekar,dainandin upasana,balopasana marathi,chaitanya,hindi,kalawati mata balopasana,kirtan,shri tatyasaheb ketkar,marathi,how to do pranayama,total stress management,nilesh jadhav,sanskaar,bramhopadesha,punyatithi utsav,brahma chaitanya,upanayanam,padhye kaka,india

परमपूज्य आई श्रीकलावतीदेवी  

भजन - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ॥

१) रंगणी तू येई आता शीघ्र गणपते हो ॥धृ०॥
वक्रतुंड एकदंत । पाशांकुश वरदहस्त ।
अर्धचंद्र शिरी किरिट । रत्न झळकते हो ॥१॥
नंदीवाहन मदनदहन । भक्त त्रिविधताप शमन ।
भस्म अंगी रुंडमाळ । कंठी शोभते हो ॥२॥
आनंदतनय मधुरवाणी । गणपतीगुण नमनपाणी ।
चरणकमली भ्रमर होउनि । अमृत सेविते हो ॥३॥

भजन - पार्वतीच्या नंदना मोरया, गजानना गजवदना ॥

२) प्रेमळ तू गुरुमाय । माझी ॥धृ०॥
जगदोद्धारा अवतरोनि । दाविले आम्हा पाय ॥१॥
बद्ध मुमुक्षु साधकांसि तू । दाविसि सुलभ उपाय ॥२॥
तुज सोडुनि व्रत जप तप खटपट । करिता होती अपाय ॥३॥
निजभक्तांसी इच्छित देउनि । दिननिशी श्रमविसी काय ॥४॥
कलिमलदहन करोनि सखंया । पाजी निजप्रेमपय ॥५॥

भजन - आनंदे गुरुमाय । निजानंदे गुरुमाय । सच्चिदानंदे गुरुमाय । पूर्णानंदे गुरुमाय ॥

३) श्रीसदगुरुपदकमली भृंग होई रे ॥धृ०॥
पळ पळ आयुष्य जाय । न मिळे पुन्हा मानवकाय ।
भवसागर तरणोपाय । हाचि पाहि रे ॥१॥
व िषयसुखी होउनि रत । जनीमृति आपदा प्राप्त ।
सोडविण्या गुरुविरहित । कोणी नाही रे ॥२॥
चारी -सहा -अठरा वदति । गुरुविण नाही जीवा गति ।
ऐसे सांगे रुक्मिणीप्रति । सिद्धआई रे ॥३॥

भजन - शांत किती हा सदगुरुमूर्ति । पाहता मावळे द्वैतभ्रांति ॥

४) दीनको दयाळ छांड कौन शरण जाऊं । एक धाम निराकार सोहि धाम पावूं ॥धृ०॥
एक वचन, एक बाण, एकपत्नि शय्या । ऐसे प्रभु छांडके हम कौनकू भजूं भैय्या ॥१॥
जिन घटमे रामनाम सोहि घट सच्चा । रामको स्वरुप जाने सोहि गुरुका बच्चा ॥२॥
रघुरामचंद्रने स्वरुपसगुणधारी । सबनको करी उद्धार पिंगला उद्धारी ॥३॥
प्रभु गरीबनके निवाज मैं गरीब तेरा । एक बार मुखसे कहो तुलसीदास मेरा ॥४॥

भजन - सीताराम जय जय राम । हरेराम, राम, राम, राम ॥

५) हे कमलजीवना कमललोचना
तारी आता । देवा ॥धृ०॥
कमलावरा तुजवाचुनि कष्टी । कमलाधीशा तुज पहाता पुष्टी ।
कमलाकरा तू पाहुनि दृष्टी । तोषवि झणी ताता । देवा ॥१॥
कमलाकांता नाम दे ओष्टी । कमलानाथा करी कृपावृष्टी ।
कमलाक्षा मज करी संतुष्टी । तुजविण न त्राता । देवा ॥२॥
कमलप्रियतमा वारी भवभया । कमलापते मज देई अभया ।
कमलारमणा रुक्मिणीप्रिया । ठेविन पदी माथा । देवा ॥३॥

भजन - उपेंद्रा भक्तचकोरचंद्रा । सत्वरि धाव बा ॥

६) भवसिंधु तारी ही गुरुमाय । त्रिताप हारी ही गुरुमाय ।
पाप दूर करी ही गुरुमाय । संकट वारी ही गुरुमाय ॥१॥
दयेचा सागर ही ०। ज्ञानाचे आगर ही ०।
प्रेमाचा पाझर ही ०। भक्तांचे माहेर ही ०॥२॥
अनाथनाथ ही ०। करी सनाथ ही ०।
त्रिगुणातीत ही ०। त्रिपुटिरहित ही ०॥३॥
सुमार्ग दावी ही ०। अज्ञान घालवी ही ०।
बोधामृत पाजवी ही ०। आनंदे नांदवि ही ०॥४॥
पतितपावन ही ०। नित्यनिरंजन ही ०।
करी मनरंजन ही ०। कलिमलदहन ही० ॥५॥

भजन - ॐ नमःशिवाय, तरणोपाय, सुलभ उपाय, तारकमंत्र गुरुंचा ॥

७) हरिसे कोई नही बडा । दीवाने क्यों गफलतमे पडा ॥धृ०॥
प्रल्हाद बेटा हरिसे लपटा । जबी खंब कडकडा ॥१॥
गोपीचंदा बचन सुनाकर । महाल मुलुख सब छोडा ॥२॥
हनुमानने सेवा कीनी । ले द्रोणागिरि उडा ॥३॥
पुंडलिकने सेवा कीनी । विठ्ठल बिटपर खडा ॥४॥
कहत कबीर सुन भाई साधु । हरिचरण चित्त जडा ॥५॥

भजन - बेळगांव शहरी अनगोळमाळी श्रीहरिमंदिरात
तेथे हरि प्रत्यक्ष नांदतो काय सांगू मात ॥१॥
हरिनामाचा गजर होतो तेथे दिनरात ।
बंधुभगिनी सर्व मिळोनि अमोघ लाभ घेत ॥२॥
आमुचा हरि कृपादृष्टीने आम्हाकडे पहात ।
पाप ताप दुःख संकटे हरिला भिउनि पळत ॥३॥

८) साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला । ठायीच मुराला अनुभवे ॥१॥
कापुराची वाती उजळली ज्योती । ठायीच समाप्ति झाली जैसी ॥२॥
मोक्षरेखे आला भाग्ये विनटलां । साधुचा अंकीला हरिभक्त ॥३॥
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जन । हरि दिसे जनी वनी आत्मतत्त्वे ॥४॥

भजन - सदगुरुमाय दाखवि पाय । तुजविण गमेना करु मी काय ॥

अर्जी

गुरुराया तव चरणदास मी अर्जी ऐकावी । दयाळा, अर्जी ऐकावी ॥धृ०॥
मी अनाथ मज सनाथ करुनि लज्जा रक्षावी ।
दयाळा, उपेक्षा नसावी । चाल ।
तवपदकमली अनन्यभक्ति सतत दृढसावी ।
दयाळा, सतत दृढसावी ॥१॥
विषयसुखाची इच्छा कदापि न मला स्पर्शावी ।
दयाळा, न मला स्पर्शावी ।
तव दिव्य ज्ञान बोधामृती मम मति घर्षावी ।
दयाळा, मम मति घर्षावी । चाल ।
तुजवाचुनिया अन्य दैवते कधी नच नवसावी ।
दयाळा, कधी नच नवसावी ॥२॥
मी माझे ही द्वैतबुद्धि स्वप्नी न वसावी ।
दयाळा, स्वप्नी न वसावी ।
स्वस्वरुपाचा अनुभव देउनि भ्रांति निरसावी ।
दयाळा, भ्रांति निरसावी । चाल ।
कलिमलदहना परमपावना तव कृपा ऐसावी ।
दयाळा, तव कृपा ऐसावी ॥३॥

भजन - जय जय पांडुरंग हरि ॥

आरती

१) आरती अनंता जय जय । आरती अनंता ॥धृ०॥
अनंत तव रुप, अनंत तव गुण । विधिहरिहरताता ॥१॥
अनंत तव नाम, अनंत तव प्रेम । तूचि कर्ताहर्ता ॥२॥
अनंत तव पद, अनंत तव कर । तारिसी तू भक्तां ॥३॥
अनंत श्रवण, अनंत नयन । काळाचा हंता ॥४॥
कलिमलदहना, सगुणनिर्गुणा । तूचि गुरुसमर्था ॥५॥

२) आरती गुरुमाई । मस्तक ठेविते पायी ॥धृ०॥
कलियुगी अवतरोनी । श्रीहरिमंदिरात ।
कलावती या नामे । प्रगटलीस आई ॥१॥
गौरवर्ण काया । सुहास्यवदन ।
शांत मूर्ति पाहता ।मन तल्लीन होई ॥२॥
चतुर्विध भक्त येती । त्यावरि समान प्रीति ।
अज्ञान निरसुनिया । देसी आनंद आई ॥३॥
भवताप निवारोनी । सुखविसी सकला ।
म्हणुनि दीन विजया । शरण आली असे पायी॥४॥

घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रुप तुझे ।
प्रेमे आलिंगीन, आनंदे पूजीन, भावे ओवाळीन म्हणे नामा ॥१॥

त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुध्द्यात्मना वा प्रकृतिस्वभावात।
करोमि यद्यत सकलं परस्म, नारायणायेति समर्पयामि ॥३॥

ॐ चैतन्यं शाश्वतं शांतं व्योमातीतं निरंजनम ।
नादबिंदुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः । गुरवे नमः । गुरवे नमः ॥

गुरुपादुकाष्टक

दयावंत कृपावंत सद्गुरुराया | अनन्यभावे शरण आलो मी पाया | भवभ्रमातुनि काढी त्वरे या दीनासी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |१|
अनंत अपराधी मी सत्य आहे | म्हणोनि तुझा दास होऊ इच्छिताहे | तुजविण हे दुःख सांगू कुणासी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |२|
मतिहीन परदेशी मी एक आहे | तुजविण जगी कोणी प्रेमे न पाहे | जननी जनक इष्ट बंधु तू मजसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |३|
जगतपसारा दिसो सर्व वाव | अखंडीत तव पायी मज देई ठाव | विषापरि विषय वाटो मनासी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |४|
तव आज्ञेसी पाळील जो एकभावे | तयासीच तू भेट देसी स्वभावे | म्हणोनि अनन्यशरण आलो मी तुजसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |५|
किती दिवस गाऊ हे संसारगाणे | तुजविण कोण हे चुकविल पेणे | नको दूर लोटू चरणी थारा दे मजसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |६|
सुवार्णासी सोडुनी कांति न राही | सुमनासी न सोडी सुवास पाही| तैसा मी राहीन निरंतर तुझ्या सेवेसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |७|
कलावंत भगवंत अनंत देवा | मनकामना पुरवि दे अखंड तव भक्तिमेवा | कृपा करोनि मज ठेवी स्वदेशी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |८|

सोमवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु ...

सोमवार - सायंकाल स्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...

मंगलवार - प्रातः स्मरण - उठा उठा हो वेगेसी ...

मंगलवार - सायंस्मरण - श्री गणपते | विघ्ननाशना ...

बुधवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागर ...

बुधवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ...

गुरुवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति कर ...

गुरुवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...

शुक्रवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...

शुक्रवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...

शनिवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...

रविवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...

रविवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...

Comments

Popular posts from this blog

बालोपासना

नित्योपासना - सोमवार - प्रातः स्मरण

नित्योपासना - मंगलवार - प्रातः स्मरण