नित्योपासना - बुधवार - प्रातः स्मरण
ॐ नम: शिवाय
परमपूज्य आई श्रीकलावतीदेवी |
प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा । अज्ञानत्व हरोनि बुध्दि मति दे आराध्य मोरेश्वरा ॥
चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी । हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी ॥१॥
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे । माथा शेंदूर पाझरे वरि बरे दूर्वांकुराचे तुरे ॥
माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे । गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ॥२॥
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।
ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॥
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं । भावातीतं त्रिगुणरहितं सदगुरुं तं नमामि ॥
तव भक्तिलागी तनु ही झिजू दे । तव चरणकमली मन हे निजू दे ॥
तव भजनी ठेवी ही वाचा रिझाया । नमस्कार माझा तुला गुरुराया ॥१॥
१) धन्य श्रीहरिमंदिर । आमुचे धन्य श्रीहरिमंदिर ॥धृ॥
सर्वतोमुखी एकचि चाले । हरिनामाचा गजर ॥१॥
भूलोकीचा स्वर्ग असे हा । दुःख नसे तिळभर ॥२॥
बद्धजीवांचे त्रिताप निववुनि । देई सदैव आधार ॥३॥
मुमुक्षूते निजबोध देई । व्हावया भवनदीपार ॥४॥
साधका सुलभ साधन दावी । दे शांति सत्वर ॥५॥
शरणागतांसी ब्रह्मोपदेशे । जाणविते अमर ॥६॥
ज्यापासुनि मी सुखी जाहले । असो विजय निरंतर ॥७॥
इंद्रियगोधने नेई निर्गुणकानना । सुटली मानसवत्से तुजविण नाकळती कोणा ॥धृ०॥
प्रबोध पहाट झाली सरले तिमिरतमरज । गुरुकृपेचा अरुण दावी सुरंगसम तेज ।
आत्मा दिनकर पाठी प्रगटे तात्काळिक सहज । जिवचंद्राचे मंडळ तेणे झाले निस्तेज ॥१॥
दृष्याभास चांदणिया असते ठाईच लोपलिया । लिंगदेहकमळीचे मधुकर सुटले आपसया ।
बुद्धिबोध चक्रवाके मिनली आपणिया । देहबुद्धिकुमुदिनी सुकोनि गेलीसे विलया ॥२॥
योगविद्येच्या पंथे साधकवृंदे चालियली । उपनिषदभागार्थ शब्द केला कोकिळी
वाग्वादाचे उलूक निघती मौनाचे ढोली । विकल्प अटवी साही चोरी सांडियली ॥३॥
विरागरश्मी जवळी धरिता चित्तरविकांत । आत्मावन्ही प्रगटे विषयवन जाळीत ।
तृष्णेच्या श्वापदावरी प्रळय अदभुत । विश्व हे लटिके मूढा मृगजळवत ॥४॥
जारव्यसनी जीव हा झाला उदमी सुविचार । वासानाकुंटिणीचा सहजे खुंटला व्यापार ।
लीलाविश्वंभरस्वामी उठिला सत्वर । चाले मुक्तेश्वर संगे धरुनिया कर ॥५॥
काष्ट तंतु चर्मे धातु । वाद्ये नकोत करी ॥धृ०॥
भक्तां अखंडानंदी रमवुनि । शेवट गोड करी ।
बळीराजाच्या भक्तिकरिता । द्वारी उभा निरंतरी ॥१॥
प्रल्हादाच्या भावार्थासी । स्तंभी प्रगटला हरि ।
गजेंद्राच्या भक्तिसाठी । कंजफुलाते वरी ॥२॥
भिल्लिणीच्या प्रेमासाठी । बोरे सेवित हरि ।
वृजयुवतीस्तव मथुरापुरी । खेळे दुडियामाजारी ॥३॥
गोपाळांचा भाव जाणुनि । खाई शिळी भाकरी । विदुरघराशी स्वये जाउनि । कण्या भक्षि श्रीहरि ॥४॥
द्रौपदीच्या भक्तिसाठी । भाजीपान सेवि हरि ।
सुदाम्याचे मूठभर पोहे । मटमट भक्षि स्वकरी ॥५॥
अर्जुनाच्या भक्तिसाठी । रथी सारथ्य करी ।
रुक्मिणीच्या एका तुलसीदलाने । तुळीला गिरिधारी ॥६॥
जाके शिर मोरमुगुट मेरो पति सोयी । शंख चक्र गदा पद्म कंठमाल सोयी ॥१॥
तात मात सुत न भ्रात आपनू न कोयी । छांडदुयी कुलकी कान क्या करेगा कोयी ॥२॥
संतनसंग बैठ बैठ लोकलाज खोयी । अब तो बात फैल गयी जाने सब कोयी ॥३॥
आंसूअन जल सिंच सिंच प्रेमबेल बोई । मीरा प्रभु लगन लगी होने होसो होयी ॥४॥
पेंद्या माध्या सौंगड्यासवे दुडु दुडु चढतो माड्या । कदंबाच्या झाडावरती ठेवी गोपींच्या साड्या ॥१॥
यमुनेतीरी धेनु चारिता गोपमेळी खेळे गोट्या । दही दूध लोणी लपुनि खाई पेंद्याचा लाडका किट्या ॥२॥
कालियाचा गर्व हराया यमुनेत मारी उड्या । कंसमामासी नकळत तोडिल्या वसुदेवदेवकीच्या बेड्या ॥३॥
हळुचि जाउनि पांडवाघरी स्वहस्ते धुतल्या घोड्या । दुर्वासमुनिस्तव गोपी धाडिल्या देउनि अन्नाच्या पाट्या ॥४॥
सखुबाईस्तव पंढरपुरचा झाला वाटाड्या । गोरोबागृही माती तुडवुनि दावि जणु माटाड्या ॥५॥
बोधल्या घरी सुगीसमयी धान्याच्या बांधी मुड्या । तुक्यासंगे दुकानी बैसुनि बांधुनि देई पुड्या ॥६॥
दामाजीस्तव बेदरी जाउनि नाम सांगे विठ्या । नामदेवाच्या कीर्तनसमयी झाला टाळकुट्या ॥७॥
आवडाबाईचा धांवा ऐकुनि लाटेसरशी दे कुड्या । रुक्मिणीसी बहु युक्तीने निजभक्तांच्या सांगतो गोठ्या ॥८॥
कीर्ति तुझी ऐकुनि दयाळा । शरण मी आलो तव पदकमला ॥१॥
माय बाप मित्र बंधु भगिनी । तुजविण मजला नाहीत कोणी ॥२॥
अनुतापे ध्रुव स्मरता तुजसी । शांतविले त्या त्वा ह्र्षीकेशी ॥३॥
प्रल्हादबाळा पितये छळिता । स्तंभि प्रगटलासी तू अनंता ॥४॥
कृष्णा धाव ऐसे म्हणता । कृष्णा रक्षिली त्वा भगवंता ॥५॥
पापी अजामिळ अंती स्मरता । त्या उद्धरिले कमलाकांता ॥६॥
रुक्मिणीरमणा पुंडलीकवरदा । रक्षी रक्षी आपुल्या बिरिदा ॥७॥
आप न आवे पतिया न भेजे । ये बात ललचावनकी ॥१॥
बिन दरशन व्याकुल भयी सजनी । जैसी बिजलियां श्रावणकी ॥२॥
क्या करुं शक्ति नही मुझे सजनी । पांख होवे तो उड जावनकी ॥३॥
मीरा कहे प्रभु गिरिधर नागर । इच्छा लगी हरि बतलावनकी ॥४॥
नाशिवंत देता, ब्रह्म येईल हातां । ऐसी ज्याची कथा, पुराणात ॥२॥
माया देउनिया, ब्रह्म घ्यावे हाती । ऐशा गुरुप्रती, का न भजा ॥३॥
तुका म्हणे गुरु, पायी लाभ आहे । मोक्ष तोचि पाहे, दास होय ॥४॥
पंचविषयी आसक्त होउनि । बनलो मी अविचारी ॥१॥
अनन्यभक्ति दान देउनि । करी मज सुविचारी ॥२॥
तवपदकमलामोद सेवुनि । राहीन निरंतरी ॥३॥
कलिमलदहना पदरी घे दीना । तूचि माझा कैवारी ॥४॥
तुजविण कोणी न वाली म्हणुनि तत्पायी लोळू । गुरुचरणाच्या बळकट ध्यासे विघ्नाते टाळू ॥१॥
ओल नाही ते फोल बोलणे क्षणोक्षणी गाळू । गुरुगुण सुंदर गीत सदोदित ह्रदयात घोळू ॥२॥
सदभाव सदभक्तिचा अरि दुःसंग वगळू । सदा गुरुभजनी रत होउनि निंदास्तुति गिळू ॥३॥
अहर्निशी गुरुबोधश्रवणे द्वैतभाव कोळू । कलिमलदहनकृपामृत पिउनि निजानंदे डोलू ॥४॥
२) ओवाळू आरती माता कलावती । पहाता तुझी मूर्ति मनकामनापूर्ति ॥धृ०॥
भावे वंदिता तव दिव्य पाउले । संसारापासुनि माझे मन भंगले ॥
तुझ्या भजनी नित चित्त रंगले । झाली ह्रत्तापाची पूर्ण शांति ॥१॥
गौरवर्ण तनुवरि शोभे शुभ्र अंबर । दर्शनमात्रे लाभे आनंद थोर ॥
भाषणे सकल संशय जाती दूर । विशालाक्ष मज दे गुणवंती ॥२॥
घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रुप तुझे ।
प्रेमे आलिंगीन, आनंदे पूजीन, भावे ओवाळीन म्हणे नामा ॥१॥
त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुध्द्यात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यद्यत सकलं परस्मै, नारायणायेति समर्पयामि ॥३॥
नमोऽस्तु अनंताय, सहस्त्रमूर्तये, सहस्त्रपादाक्षशिरोरुबाहवे, सहस्त्रनाम्ने पुरुषाय शाश्वते, सहस्त्रकोटीयुगधारणे नमः ॥
माझ्या मनाची चंचलता दूर कर.
हे सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वोत्तमा, सर्वज्ञा !
तुला ओळखण्याचे मला ज्ञान दे .
हे प्रेमसागरा, प्रेमानंदा, प्रेममूर्ते, प्रेमरूपा !
माझे दुर्गुण नाहीसे करून शुद्ध प्रेमाने हृदय भरू दे.
हे ज्ञानेशा, ज्ञानमुर्ते, ज्ञानांजना, ज्ञानज्योति !
तुझ्या चरणी माझी श्रद्धा, भक्ती द्रुढ कर.
हे मायातीता, मायबापा, मायाचालका, मायामोहहरणा !
समदृष्टी आणि अढळ शांति मला दे .
हे कमलनयना, कमलाकांता, कमलानाथा, कमलाधीशा !
माझ्या नेत्रांना सर्व स्थावर-जंगमात तुझे दर्शन घडू दे .
माझे कान तुझे कीर्तन श्रवण करू देत.
हे पतितपावना, परमेशा, परमानंदा, परमप्रिया !
माझ्या हस्ताने तुझी पूजा घडू दे.
तुझ्याभोवती माझे पाय प्रदक्षिणा घालू देत.
हे गुरुनाथा, गुरुमूर्ते, गुरुराजा, गुरुदेवा !
माझे मन निरंतर तुझे ध्यान करू दे.
तुझ्या चरणकमली मला अखंड थारा दे.
सोमवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु ...
सोमवार - सायंकाल स्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
मंगलवार - प्रातः स्मरण - उठा उठा हो वेगेसी ...
मंगलवार - सायंस्मरण - श्री गणपते | विघ्ननाशना ...
बुधवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ...
गुरुवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति कर ...
गुरुवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
शुक्रवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
शुक्रवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
शनिवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
शनिवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
रविवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
रविवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी । हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी ॥१॥
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे । माथा शेंदूर पाझरे वरि बरे दूर्वांकुराचे तुरे ॥
माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे । गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ॥२॥
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।
ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॥
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं । भावातीतं त्रिगुणरहितं सदगुरुं तं नमामि ॥
तव भक्तिलागी तनु ही झिजू दे । तव चरणकमली मन हे निजू दे ॥
तव भजनी ठेवी ही वाचा रिझाया । नमस्कार माझा तुला गुरुराया ॥१॥
१) धन्य श्रीहरिमंदिर । आमुचे धन्य श्रीहरिमंदिर ॥धृ॥
सर्वतोमुखी एकचि चाले । हरिनामाचा गजर ॥१॥
भूलोकीचा स्वर्ग असे हा । दुःख नसे तिळभर ॥२॥
बद्धजीवांचे त्रिताप निववुनि । देई सदैव आधार ॥३॥
मुमुक्षूते निजबोध देई । व्हावया भवनदीपार ॥४॥
साधका सुलभ साधन दावी । दे शांति सत्वर ॥५॥
शरणागतांसी ब्रह्मोपदेशे । जाणविते अमर ॥६॥
ज्यापासुनि मी सुखी जाहले । असो विजय निरंतर ॥७॥
भजन - गुरुराया मजवरी करी करुणा । तुजविण शरण मी जाऊ कुणा ॥
२) उठि रे गोपाळा, उघडी स्वरुपलोचना । सरली अविद्याराती उदयो झाला रविकिरणा ।इंद्रियगोधने नेई निर्गुणकानना । सुटली मानसवत्से तुजविण नाकळती कोणा ॥धृ०॥
प्रबोध पहाट झाली सरले तिमिरतमरज । गुरुकृपेचा अरुण दावी सुरंगसम तेज ।
आत्मा दिनकर पाठी प्रगटे तात्काळिक सहज । जिवचंद्राचे मंडळ तेणे झाले निस्तेज ॥१॥
दृष्याभास चांदणिया असते ठाईच लोपलिया । लिंगदेहकमळीचे मधुकर सुटले आपसया ।
बुद्धिबोध चक्रवाके मिनली आपणिया । देहबुद्धिकुमुदिनी सुकोनि गेलीसे विलया ॥२॥
योगविद्येच्या पंथे साधकवृंदे चालियली । उपनिषदभागार्थ शब्द केला कोकिळी
वाग्वादाचे उलूक निघती मौनाचे ढोली । विकल्प अटवी साही चोरी सांडियली ॥३॥
विरागरश्मी जवळी धरिता चित्तरविकांत । आत्मावन्ही प्रगटे विषयवन जाळीत ।
तृष्णेच्या श्वापदावरी प्रळय अदभुत । विश्व हे लटिके मूढा मृगजळवत ॥४॥
जारव्यसनी जीव हा झाला उदमी सुविचार । वासानाकुंटिणीचा सहजे खुंटला व्यापार ।
लीलाविश्वंभरस्वामी उठिला सत्वर । चाले मुक्तेश्वर संगे धरुनिया कर ॥५॥
भजन - गुरुवरा सदगुरुवरा, येउंदे करुणा तुला रे मायबाप ॥
३) भक्तीची आवड भारी । प्रभुला ।काष्ट तंतु चर्मे धातु । वाद्ये नकोत करी ॥धृ०॥
भक्तां अखंडानंदी रमवुनि । शेवट गोड करी ।
बळीराजाच्या भक्तिकरिता । द्वारी उभा निरंतरी ॥१॥
प्रल्हादाच्या भावार्थासी । स्तंभी प्रगटला हरि ।
गजेंद्राच्या भक्तिसाठी । कंजफुलाते वरी ॥२॥
भिल्लिणीच्या प्रेमासाठी । बोरे सेवित हरि ।
वृजयुवतीस्तव मथुरापुरी । खेळे दुडियामाजारी ॥३॥
गोपाळांचा भाव जाणुनि । खाई शिळी भाकरी । विदुरघराशी स्वये जाउनि । कण्या भक्षि श्रीहरि ॥४॥
द्रौपदीच्या भक्तिसाठी । भाजीपान सेवि हरि ।
सुदाम्याचे मूठभर पोहे । मटमट भक्षि स्वकरी ॥५॥
अर्जुनाच्या भक्तिसाठी । रथी सारथ्य करी ।
रुक्मिणीच्या एका तुलसीदलाने । तुळीला गिरिधारी ॥६॥
भजन - मजला उध्दरि सदगुरुनाथा श्रीगुरुनाथा, तू मायबाप दीनांचा ॥
४) मेरे तो गिरिधर गोपाल दूसरा न कोयी ॥धृ०॥जाके शिर मोरमुगुट मेरो पति सोयी । शंख चक्र गदा पद्म कंठमाल सोयी ॥१॥
तात मात सुत न भ्रात आपनू न कोयी । छांडदुयी कुलकी कान क्या करेगा कोयी ॥२॥
संतनसंग बैठ बैठ लोकलाज खोयी । अब तो बात फैल गयी जाने सब कोयी ॥३॥
आंसूअन जल सिंच सिंच प्रेमबेल बोई । मीरा प्रभु लगन लगी होने होसो होयी ॥४॥
भजन - जगदीशा, जय जय पुराणपुरुषा । सदगुरु धाव बा ॥
५) यशोदानंद बालमुकुंद श्रीहरि करितो सदा खोड्या ॥धृ०॥पेंद्या माध्या सौंगड्यासवे दुडु दुडु चढतो माड्या । कदंबाच्या झाडावरती ठेवी गोपींच्या साड्या ॥१॥
यमुनेतीरी धेनु चारिता गोपमेळी खेळे गोट्या । दही दूध लोणी लपुनि खाई पेंद्याचा लाडका किट्या ॥२॥
कालियाचा गर्व हराया यमुनेत मारी उड्या । कंसमामासी नकळत तोडिल्या वसुदेवदेवकीच्या बेड्या ॥३॥
हळुचि जाउनि पांडवाघरी स्वहस्ते धुतल्या घोड्या । दुर्वासमुनिस्तव गोपी धाडिल्या देउनि अन्नाच्या पाट्या ॥४॥
सखुबाईस्तव पंढरपुरचा झाला वाटाड्या । गोरोबागृही माती तुडवुनि दावि जणु माटाड्या ॥५॥
बोधल्या घरी सुगीसमयी धान्याच्या बांधी मुड्या । तुक्यासंगे दुकानी बैसुनि बांधुनि देई पुड्या ॥६॥
दामाजीस्तव बेदरी जाउनि नाम सांगे विठ्या । नामदेवाच्या कीर्तनसमयी झाला टाळकुट्या ॥७॥
आवडाबाईचा धांवा ऐकुनि लाटेसरशी दे कुड्या । रुक्मिणीसी बहु युक्तीने निजभक्तांच्या सांगतो गोठ्या ॥८॥
भजन - श्रीकृष्ण चैतन्यप्रभु नित्यानंदा । हरेराम हरेकृष्ण राधेगोविंदा ॥
६) प्रभुरा या तारी या भवापासुनि ॥धृ०॥कीर्ति तुझी ऐकुनि दयाळा । शरण मी आलो तव पदकमला ॥१॥
माय बाप मित्र बंधु भगिनी । तुजविण मजला नाहीत कोणी ॥२॥
अनुतापे ध्रुव स्मरता तुजसी । शांतविले त्या त्वा ह्र्षीकेशी ॥३॥
प्रल्हादबाळा पितये छळिता । स्तंभि प्रगटलासी तू अनंता ॥४॥
कृष्णा धाव ऐसे म्हणता । कृष्णा रक्षिली त्वा भगवंता ॥५॥
पापी अजामिळ अंती स्मरता । त्या उद्धरिले कमलाकांता ॥६॥
रुक्मिणीरमणा पुंडलीकवरदा । रक्षी रक्षी आपुल्या बिरिदा ॥७॥
भजन - तुमबिन गुरुजी मै निराधार । अनाथ को मुझे देवोजी आधार ॥
७) मोहन आवनकी कोई कीजो रे । आवनकी मन भावनकी ॥ध्रु०॥आप न आवे पतिया न भेजे । ये बात ललचावनकी ॥१॥
बिन दरशन व्याकुल भयी सजनी । जैसी बिजलियां श्रावणकी ॥२॥
क्या करुं शक्ति नही मुझे सजनी । पांख होवे तो उड जावनकी ॥३॥
मीरा कहे प्रभु गिरिधर नागर । इच्छा लगी हरि बतलावनकी ॥४॥
भजन - सच्चिदानंद कृष्ण सच्चिदानंद ॥
८) सदगुरुचे पायी, देहासी अर्पिता । तात्काळ मुक्तता, येते हातां ॥१॥नाशिवंत देता, ब्रह्म येईल हातां । ऐसी ज्याची कथा, पुराणात ॥२॥
माया देउनिया, ब्रह्म घ्यावे हाती । ऐशा गुरुप्रती, का न भजा ॥३॥
तुका म्हणे गुरु, पायी लाभ आहे । मोक्ष तोचि पाहे, दास होय ॥४॥
भजन - चला चला रे सर्व मिळोनि श्रीहरिमंदिरी जाऊ, तेथे हरिनाम घेऊ । माळ हरिगळां वाहू ॥
९) शेवट गोड करी । गुरुराया ॥धृ०॥पंचविषयी आसक्त होउनि । बनलो मी अविचारी ॥१॥
अनन्यभक्ति दान देउनि । करी मज सुविचारी ॥२॥
तवपदकमलामोद सेवुनि । राहीन निरंतरी ॥३॥
कलिमलदहना पदरी घे दीना । तूचि माझा कैवारी ॥४॥
भजन - महाराज सिध्दारुढ माउली ॥
आरती
१) काकड आरती माझ्या प्रेमळ सिध्दा ओवाळू । अनन्यभावे शरण जाउनि आज्ञेसी पाळू ॥धृ०॥तुजविण कोणी न वाली म्हणुनि तत्पायी लोळू । गुरुचरणाच्या बळकट ध्यासे विघ्नाते टाळू ॥१॥
ओल नाही ते फोल बोलणे क्षणोक्षणी गाळू । गुरुगुण सुंदर गीत सदोदित ह्रदयात घोळू ॥२॥
सदभाव सदभक्तिचा अरि दुःसंग वगळू । सदा गुरुभजनी रत होउनि निंदास्तुति गिळू ॥३॥
अहर्निशी गुरुबोधश्रवणे द्वैतभाव कोळू । कलिमलदहनकृपामृत पिउनि निजानंदे डोलू ॥४॥
२) ओवाळू आरती माता कलावती । पहाता तुझी मूर्ति मनकामनापूर्ति ॥धृ०॥
भावे वंदिता तव दिव्य पाउले । संसारापासुनि माझे मन भंगले ॥
तुझ्या भजनी नित चित्त रंगले । झाली ह्रत्तापाची पूर्ण शांति ॥१॥
गौरवर्ण तनुवरि शोभे शुभ्र अंबर । दर्शनमात्रे लाभे आनंद थोर ॥
भाषणे सकल संशय जाती दूर । विशालाक्ष मज दे गुणवंती ॥२॥
घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रुप तुझे ।
प्रेमे आलिंगीन, आनंदे पूजीन, भावे ओवाळीन म्हणे नामा ॥१॥
त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुध्द्यात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यद्यत सकलं परस्मै, नारायणायेति समर्पयामि ॥३॥
नमोऽस्तु अनंताय, सहस्त्रमूर्तये, सहस्त्रपादाक्षशिरोरुबाहवे, सहस्त्रनाम्ने पुरुषाय शाश्वते, सहस्त्रकोटीयुगधारणे नमः ॥
विज्ञापना
हे विश्वजनका, विश्वंभरा, विश्वपालका, विश्वेश्वरा !माझ्या मनाची चंचलता दूर कर.
हे सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वोत्तमा, सर्वज्ञा !
तुला ओळखण्याचे मला ज्ञान दे .
हे प्रेमसागरा, प्रेमानंदा, प्रेममूर्ते, प्रेमरूपा !
माझे दुर्गुण नाहीसे करून शुद्ध प्रेमाने हृदय भरू दे.
हे ज्ञानेशा, ज्ञानमुर्ते, ज्ञानांजना, ज्ञानज्योति !
तुझ्या चरणी माझी श्रद्धा, भक्ती द्रुढ कर.
हे मायातीता, मायबापा, मायाचालका, मायामोहहरणा !
समदृष्टी आणि अढळ शांति मला दे .
हे कमलनयना, कमलाकांता, कमलानाथा, कमलाधीशा !
माझ्या नेत्रांना सर्व स्थावर-जंगमात तुझे दर्शन घडू दे .
माझे कान तुझे कीर्तन श्रवण करू देत.
हे पतितपावना, परमेशा, परमानंदा, परमप्रिया !
माझ्या हस्ताने तुझी पूजा घडू दे.
तुझ्याभोवती माझे पाय प्रदक्षिणा घालू देत.
हे गुरुनाथा, गुरुमूर्ते, गुरुराजा, गुरुदेवा !
माझे मन निरंतर तुझे ध्यान करू दे.
तुझ्या चरणकमली मला अखंड थारा दे.
सोमवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु ...
सोमवार - सायंकाल स्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
मंगलवार - प्रातः स्मरण - उठा उठा हो वेगेसी ...
मंगलवार - सायंस्मरण - श्री गणपते | विघ्ननाशना ...
बुधवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ...
गुरुवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति कर ...
गुरुवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
शुक्रवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
शुक्रवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
शनिवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
शनिवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
रविवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
रविवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
Comments
Post a Comment