नित्योपासना - रविवार - सायंस्मरण

ॐ नम: शिवाय
param pujya kalavati aai nityopasana,gondavalekar maharaj,gondavale,brahmachaitanya,maharaj,meditation,nityanustaana,upasana,balopasana,marathi upasana,nirupan,gondavlekar,gondavalekar,dainandin upasana,balopasana marathi,chaitanya,hindi,kalawati mata balopasana,kirtan,shri tatyasaheb ketkar,marathi,how to do pranayama,total stress management,nilesh jadhav,sanskaar,bramhopadesha,punyatithi utsav,brahma chaitanya,upanayanam,padhye kaka,india

परमपूज्य आई श्रीकलावतीदेवी  

भजन - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ॥

१) गणराज गजानन रे, सिंधु आनंदाचा ॥धृ०॥
ऋद्धिसिद्धिचा दाता, स्वामी त्रैलोक्याचा ।
योगी ध्याती सप्रेमे, धन्य महिमा त्याचा ।
चाल । करा घोष या नामाचा ।
ताल मृदंग वीणास्वरे गाउनि,
त्यापुढे लोळा नाचा रे ॥१॥
लाडू मोदक दिव्यान्ने, दूर्वा पुष्पे नाना ।
ऐसे अर्पुनी त्याला, मग ध्यानी आणा ।
विघ्नसंकटपापांचे, भस्म होईल जाणा ।
चाल । पावे भक्तां श्रीगणराणा ।
संतति संपत्ति सन्मति सदगति,
देतो सत्य जाणा रे ॥२॥
दीनबंधु दयार्णव तो, वाचे वर्णू मी काय ।
आता न सोडी मी या, मोरयाचे पाय ।
रुप पाहता डोळां, अहंममता जाय । चाल । सुख अदभुत ऐसे होय ।
दत्तनिरंजन आनंदचिदघन, गोसावीनंदन ध्यायी रे ॥३॥

भजन - पार्वतीच्या नंदना मोरया, गजानना गजवदना ॥

२) या दीनेची करुणा येउंदे आई । चरणावरी ठेविते डोई ॥धृ०॥
जन उद्धारार्थ अवतरुनि । हरिमंदिरी वास करोनि ।
सकलांचे हेतु पुरवुनि । आनंदविशी तू आई ।
चरणावरी ठेविते डोई ॥१॥
तू सर्वसाक्षी अससी । सर्वांतर्यामी नित वससी ।
परि गुप्तरुपे तू राहसी । जगी थोर एक तू आई ॥च०॥२॥
बहुरुपी बहुगुणी अससी । क्षणात रंका राव करिसी ।
सकलां परि वरि वरि दिससी । तव प्रभाव वानु मी काई ॥च०॥३॥
तू अससी सुखाची जनीता । तव दर्शनमात्रे ताता ।
पाप ताप झडुनि चित्ता । आनंद भरुनि राही ॥च०॥४॥
बोधामृत मज पाजोनि । भवतापाते निरसोनि ।
सुखी केले मज लागोनि । कैशी मी होऊ उतराई ॥च०॥५॥
तुज क्षणभरी नच मी पाही । तरी युगसम चित्ता होई । सहवास निरंतर देई । तुजविण मज नाठवो काही ॥च०॥६॥
तू लोकत्रयाचा तात । दीन - अनाथांचा नाथ ।
शरणागतांसी कृपावंत । तुजविण मज दैवत नाही ॥च०॥७॥
शोभसी जननी जगताला । प्रेमपय पाजवुनि सकलां ।
केले कलिमलहरणाला । सकल तीर्थक्षेत्र तव पायी ॥च०॥८॥

भजन - आनंदे गुरुमाय । निजानंदे गुरुमाय । सच्चिदानंदे गुरुमाय । पूर्णानंदे गुरुमाय ॥

३) सदगुरु माझी माय रे । वंदिताचि पाय रे ।
वत्सा जैसी गाय तैसी । पाजी प्रेमपय रे ॥१॥
सदगुरुला जाणा रे । तुम्ही सदगुरुला वाना रे ।
कृत्रिमछंद सोडुनि अवघे । भजा भक्तराणा रे ॥२॥
जाण तू गुरुमहिमान रे । न लगे साधन आन रे ।
आनंदाची खाण सिद्धारुढ रुक्मिणीप्राण रे ॥३॥

भजन - शांत किती हा सदगुरुमूर्ति । पाहता मावळे द्वैतभ्रांति ॥

४) लगाले प्रेम ईश्वरसे । अगर तू मोक्ष चाहता है ॥धृ०॥
रचा उसने जगत सारा करे ओ पालना सबकी ।
ओही मालक दुनियाका पितामाताभी दाता है ॥१॥
नही पातालके अंदर नही आकाशके ऊपर ।
सदा ओ पास है तेरा कहां ढुंढनकू जाता है ॥२॥
करो जप नेम तप भारी रहो जाकर सदा बनमो ।
बिना सदगुरु संगतसे नही ओ दिलमे आता है ॥३॥
पडे जो शरणमे उसकी छोड दुनियाकी लालचकू ।
ओ ब्रह्मानंद निश्चयसे परमसुखधाम पाता है ॥४॥

भजन - सीताराम जय जय राम । हरेराम, राम, राम, राम ॥

५) हरि हरि बोल बोल बोल । हा मंत्र नाही खोल ॥धृ०॥
हरि म्हणता पाप ताप निवारण । वद हे नाम अमोल अमोल अमोल ॥१॥
हरिरस सेविता अमर होसी बापा । देशिल प्रेमे डोल डोल डोल ॥२॥
खाता पिता उठता बसता । नाम घेता नलगे मोल मोल मोल ॥३॥
तीर्थव्रतादि करुनि देह दंडिसि । परि ते नामाविण फोल फोल फोल ॥४॥
रुक्मिणी हरिपदी तल्लीन झाली । पाहता रुप सखोल सखोल सखोल ॥५॥

भजन - उपेंद्रा भक्तचकोरचंद्रा । सत्वरि धाव बा ॥

६) फकीर झालो मी फकीर बाबा ॥धृ०॥
देणे घेणे हरिनाम हाचि धंदा । जन करिति निंदा । नाही फिकीर ॥१॥
संतांची चाकरी भक्तीची भाकरी । खाउनि पोटभरी । दिधला ढेकर ॥२॥
कुमार्गझाडणी दंग अनुदिनी । प्रेमाची कफनी । घाली निरंतर ॥३॥
दिनरात हासत नाचत खेळत । प्रेमानंदे डोले । ध्यात रखुमाईवर ॥४॥

भजन - ॐ नमःशिवाय, तरणोपाय, सुलभ उपाय, तारकमंत्र गुरुंचा ॥

७) नजर न आवे आतमज्योती ॥धृ०॥
तेल ना बत्ती बुझ नही जाती । नही जागत नही सोती ॥१॥
झिलमिल झिलमिल निशिदिन चमके । जैसा निर्मल मोती ॥२॥
कहत कबीर सुन भाई साधु । घर घर बाचत पोथी ॥३॥

भजन - बेळगांव शहरी अनगोळमाळी श्रीहरिमंदिरात
तेथे हरि प्रत्यक्ष नांदतो काय सांगू मात ॥१॥
हरिनामाचा गजर होतो तेथे दिनरात ।
बंधुभगिनी सर्व मिळोनि अमोघ लाभ घेत ॥२॥
आमुचा हरि कृपादृष्टीने आम्हाकडे पहात ।
पाप ताप दुःख संकटे हरिला भिउनि पळत ॥३॥

८) काय वानु आता, न पुरे ही वाणी | मस्तक चरणी ठेवीतसे ॥१॥
थोरीव सांडिली, आपुली परिसे । नेणे शिवो कैसे, लोखंडासी ॥२॥
जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूति । देह कष्टविती, उपकारे ॥३॥
भूतांची ती दया हे, भांडवल संता । आपुलिया ममता, नाही देही ॥४॥
तुका म्हणे सुख, परावियां सुखे । अमृत हे मुखे, स्त्रवतसे ॥५॥

भजन - सदगुरुमाय दाखवि पाय । तुजविण गमेना करु मी काय ॥

अर्जी

गुरुराया तव चरणदास मी अर्जी ऐकावी । दयाळा, अर्जी ऐकावी ॥धृ०॥
मी अनाथ मज सनाथ करुनि लज्जा रक्षावी ।
दयाळा, उपेक्षा नसावी । चाल ।
तवपदकमली अनन्यभक्ति सतत दृढसावी ।
दयाळा, सतत दृढसावी ॥१॥
विषयसुखाची इच्छा कदापि न मला स्पर्शावी ।
दयाळा, न मला स्पर्शावी ।
तव दिव्य ज्ञान बोधामृती मम मति घर्षावी ।
दयाळा, मम मति घर्षावी । चाल ।
तुजवाचुनिया अन्य दैवते कधी नच नवसावी ।
दयाळा, कधी नच नवसावी ॥२॥
मी माझे ही द्वैतबुद्धि स्वप्नी न वसावी ।
दयाळा, स्वप्नी न वसावी ।
स्वस्वरुपाचा अनुभव देउनि भ्रांति निरसावी ।
दयाळा, भ्रांति निरसावी । चाल ।
कलिमलदहना परमपावना तव कृपा ऐसावी ।
दयाळा, तव कृपा ऐसावी ॥३॥

भजन - जय जय पांडुरंग हरि ॥

आरती

१) आरती अनंता जय जय । आरती अनंता ॥धृ०॥
अनंत तव रुप, अनंत तव गुण । विधिहरिहरताता ॥१॥
अनंत तव नाम, अनंत तव प्रेम । तूचि कर्ताहर्ता ॥२॥
अनंत तव पद, अनंत तव कर । तारिसी तू भक्तां ॥३॥
अनंत श्रवण, अनंत नयन । काळाचा हंता ॥४॥
कलिमलदहना, सगुणनिर्गुणा । तूचि गुरुसमर्था ॥५॥

२) आरती गुरुमाई । मस्तक ठेविते पायी ॥धृ०॥
कलियुगी अवतरोनी । श्रीहरिमंदिरात ।
कलावती या नामे । प्रगटलीस आई ॥१॥
गौरवर्ण काया । सुहास्यवदन ।
शांत मूर्ति पाहता ।मन तल्लीन होई ॥२॥
चतुर्विध भक्त येती । त्यावरि समान प्रीति ।
अज्ञान निरसुनिया । देसी आनंद आई ॥३॥
भवताप निवारोनी । सुखविसी सकला ।
म्हणुनि दीन विजया । शरण आली असे पायी॥४॥

घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रुप तुझे ।
प्रेमे आलिंगीन, आनंदे पूजीन, भावे ओवाळीन म्हणे नामा ॥१॥

त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुध्द्यात्मना वा प्रकृतिस्वभावात।
करोमि यद्यत सकलं परस्म, नारायणायेति समर्पयामि ॥३॥

ॐ चैतन्यं शाश्वतं शांतं व्योमातीतं निरंजनम ।
नादबिंदुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः । गुरवे नमः । गुरवे नमः ॥

गुरुपादुकाष्टक

दयावंत कृपावंत सद्गुरुराया | अनन्यभावे शरण आलो मी पाया | भवभ्रमातुनि काढी त्वरे या दीनासी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |१|
अनंत अपराधी मी सत्य आहे | म्हणोनि तुझा दास होऊ इच्छिताहे | तुजविण हे दुःख सांगू कुणासी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |२|
मतिहीन परदेशी मी एक आहे | तुजविण जगी कोणी प्रेमे न पाहे | जननी जनक इष्ट बंधु तू मजसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |३|
जगतपसारा दिसो सर्व वाव | अखंडीत तव पायी मज देई ठाव | विषापरि विषय वाटो मनासी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |४|
तव आज्ञेसी पाळील जो एकभावे | तयासीच तू भेट देसी स्वभावे | म्हणोनि अनन्यशरण आलो मी तुजसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |५|
किती दिवस गाऊ हे संसारगाणे | तुजविण कोण हे चुकविल पेणे | नको दूर लोटू चरणी थारा दे मजसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |६|
सुवार्णासी सोडुनी कांति न राही | सुमनासी न सोडी सुवास पाही| तैसा मी राहीन निरंतर तुझ्या सेवेसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |७|
कलावंत भगवंत अनंत देवा | मनकामना पुरवि दे अखंड तव भक्तिमेवा | कृपा करोनि मज ठेवी स्वदेशी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |८|

॥ श्रीसदगुरुनाथ महाराज की जय ॥

सोमवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु ...

सोमवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...

मंगलवार - प्रातः स्मरण - उठा उठा हो वेगेसी ...

मंगलवार - सायंस्मरण - श्री गणपते | विघ्ननाशना ...

बुधवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागर ...

बुधवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ...

गुरुवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति कर ...

गुरुवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...

शुक्रवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...

शुक्रवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...

शनिवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...

शनिवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...

रविवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...

Comments

Popular posts from this blog

बालोपासना

नित्योपासना - सोमवार - प्रातः स्मरण

नित्योपासना - मंगलवार - प्रातः स्मरण