नित्योपासना - रविवार - प्रातः स्मरण
ॐ नम: शिवाय
![]() |
परमपूज्य आई श्रीकलावतीदेवी |
प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा । अज्ञानत्व हरोनि बुध्दि मति दे आराध्य मोरेश्वरा ॥
चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी । हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी ॥१॥
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे । माथा शेंदूर पाझरे वरि बरे दूर्वांकुराचे तुरे ॥
माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे । गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ॥२॥
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।
ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॥
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं । भावातीतं त्रिगुणरहितं सदगुरुं तं नमामि ॥
तव भक्तिलागी तनु ही झिजू दे । तव चरणकमली मन हे निजू दे ॥
तव भजनी ठेवी ही वाचा रिझाया । नमस्कार माझा तुला गुरुराया ॥१॥
१) धन्य श्रीहरिमंदिर । आमुचे धन्य श्रीहरिमंदिर ॥धृ॥
सर्वतोमुखी एकचि चाले । हरिनामाचा गजर ॥१॥
भूलोकीचा स्वर्ग असे हा । दुःख नसे तिळभर ॥२॥
बद्धजीवांचे त्रिताप निववुनि । देई सदैव आधार ॥३॥
मुमुक्षूते निजबोध देई । व्हावया भवनदीपार ॥४॥
साधका सुलभ साधन दावी । दे शांति सत्वर ॥५॥
शरणागतांसी ब्रह्मोपदेशे । जाणविते अमर ॥६॥
ज्यापासुनि मी सुखी जाहले । असो विजय निरंतर ॥७॥
हा समयो जरि टळला, तरि अंतरला श्रीराम ॥धृ०॥
जीव शिव दोघेजण, भरत आणि शत्रुघ्न ।
आला बंधु लक्ष्मण, मन उन्मन होउनि ॥१॥
विवेकवशिष्ठ सदगुरु, संत सज्जन मुनीश्वरु ।
करिती नामाचा गजरु, हर्षनिर्भर होउनिया ॥२॥
सात्त्विकसुमंत प्रधान, नगरवासी अवघे जन ।
आला वायुचा नंदन, श्रीचरण पहावया ॥३॥
माता जानकी बिघडली, होती प्रारब्धे लिहिली ।
तिची देहबुद्धि जाळिली, आलिंगिली श्रीरामे ॥४॥
आजची दिवाळी दसरा, पर्वकाळ आला घरा ।
रामानंदाच्या दातारा, भेटी माहेरा मज द्यावी ॥५॥
काय सुंदर रघुराय तव रुप हे । माय तू आमुची, पाय दावी ।
वंदितो तव पदा, घालवी आपदा । ने मला निजपदा, पूर्णकामा ॥१॥
चरण सेवी हनुमंत पुलकित तनु । हस्तधृतशरधनु काय वानू ।
जवळी भ्राता वसे, अंकि सीता बसे । लोकमाताचि ही शरण आम्हा ॥२॥
माथि फेटा जटा, नेसी पीतापटा । रत्नमय गोमटा, कमरिपट्टा ।
मोतियांचा तुरा, माजि चमके हिरा । लाजवी मोहरा, पूर्णसोमा ॥३॥
मुक्तमाळा गळां, कस्तुरीचा टिळा । हास्यमुख सांवळा राम माझा ।
सार संसारि या, काही नाही म्हणुनि । कृष्णसुत घेई, तव गोड नामा ॥४॥
जिही चरणनसे निकसी । सुरसरी शंकर जटासमाई ।
जटाशंकरी नाम पर्यो है । त्रिभुवनतारण आई ॥१॥
जिन चरणनकी चरणपादुका । भरत रह्यो लवलाही ।
सोही चरण केवट धोय लिनो । तब हरि नाव चलाई ॥२॥
सोही चरण संतनजन सेवत । सदा रहत सुखदाई ।
सोही चरण गौतुमऋषिनारी । परसपरमपद पाई ॥३॥
दंडकवन प्रभु पावन किन्हो । ऋषिजन त्रास मिटाई ।
सो ठाकूर त्रिलोकके स्वामी । कनकमृगासंग धाई ॥४॥
कपि -सुग्रीव -बंधुभय -व्याकुल । तिन जयछत्र धराई ।
रिपुको अनुज बिभीषण निशिचर । परसत लंका पाई ॥५॥
शिवसनकादिक अरुब्रह्मादिक । शेष सहसमुख गाई ।
तुलसीदास मारुतसुतकी प्रभु । निजमुख करत बडाई ॥६॥
भवदुःखे मी बहुतचि गांजलो । दावी तुझे रुप गोड ॥१॥
कल्पनासासू करी अति जाचू । सत्वरि पाय इचे तोड ॥२॥
वासनानणंदुली किती सोसू तिची बोली । एक वेळ मोडी खोड ॥३॥
कामदादुला क्षण न सोडी मला । याची कंबर मोड ॥४॥
क्रोधसासरा नेदी आसरा । त्याचे डोळे फोड ॥५॥
ममताजाऊ छी थूं करिते । जिव्हां छेदुनि सोड ॥६॥
लोभदीर मज लाथ मारितो । असे सर्वाहुनि द्वाड ॥७॥
दयाघना मज सहवेना वेदना । ह्रदयग्रंथी तोड ॥८॥
कलिमलदहना कृपा करोनि । पुरवि मनीचे कोड ॥९॥
काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ॥१॥
काय केली सीतामाई । येथे राही रखमाबाई ॥२॥
काय केली शरयू गंगा । येथे आणिली चंद्रभागा ॥३॥
धनुष्यबाण काय केले । कर कटावरी ठेविले ॥४॥
काय केले वानरदळ । येथे मिळविले गोपाळ ॥५॥
काय केला हनुमंत । येथे उभा पुंडलिकभक्त ॥६॥
रामी रामदास भाव । जैसा भाव तैसा पंढरीराव ॥७॥
उत्तम नरदेह पाया प्राणी । इसका हित कछु कर ले ।
सदगुरु शरण जाके बाबा । जनम -मरण दूर कर ले ॥१॥
कहांसे आया कहां जावेगा । ये कछु मालुम करना ।
दो दिनकी जिंदगानी बंदे । हुशार होकर चलना ॥२॥
कौन किसीके जोरु लडके । कौन किसीके साले ।
जबलग पल्लोमे पैसा भाई । तबलग मिठ्ठा बोले ॥३॥
कहत कबीर सुन भाई साधु । बार बार नही आना ।
अपना हित कछु कर ले बाबा । अखेर अकेला जाना ॥४॥
गुरुरावस्वामी, आहे स्वप्रकाश । ज्यापुढे उदास, चंद्र रवि ॥२॥
वेदा पडले मौन, शास्त्रे वेडावली । वाचा हे निमाली ते श्रीगुरु ॥३॥
श्रीगुरु जयासी, पाहे कृपादृष्टी । तयासी ही सृष्टी, पांडुरंग ॥४॥
प्रभुराज, माझा, स्वामी गुरुराव । देतो मज भाव -शुद्धी भूमी ॥५॥
भूमी शुद्ध करी, ज्ञानबीज पेरी । अद्वैत हे धरी, मी तू नेणे ॥६॥
मजलागी माझी, सदगुरु माउली । कृपा करी साउली, वर्णू काय ॥७॥
एकाजनार्दनी, गुरु परब्रह्म । तयाचे पै नाम, सदा मुखी ॥८॥
पंचविषयी आसक्त होउनि । बनलो मी अविचारी ॥१॥
अनन्यभक्ति दान देउनि । करी मज सुविचारी ॥२॥
तवपदकमलामोद सेवुनि । राहीन निरंतरी ॥३॥
कलिमलदहना पदरी घे दीना । तूचि माझा कैवारी ॥४॥
तुजविण कोणी न वाली म्हणुनि तत्पायी लोळू । गुरुचरणाच्या बळकट ध्यासे विघ्नाते टाळू ॥१॥
ओल नाही ते फोल बोलणे क्षणोक्षणी गाळू । गुरुगुण सुंदर गीत सदोदित ह्रदयात घोळू ॥२॥
सदभाव सदभक्तिचा अरि दुःसंग वगळू । सदा गुरुभजनी रत होउनि निंदास्तुति गिळू ॥३॥
अहर्निशी गुरुबोधश्रवणे द्वैतभाव कोळू । कलिमलदहनकृपामृत पिउनि निजानंदे डोलू ॥४॥
२) ओवाळू आरती माता कलावती । पहाता तुझी मूर्ति मनकामनापूर्ति ॥धृ०॥
भावे वंदिता तव दिव्य पाउले । संसारापासुनि माझे मन भंगले ॥
तुझ्या भजनी नित चित्त रंगले । झाली ह्रत्तापाची पूर्ण शांति ॥१॥
गौरवर्ण तनुवरि शोभे शुभ्र अंबर । दर्शनमात्रे लाभे आनंद थोर ॥
भाषणे सकल संशय जाती दूर । विशालाक्ष मज दे गुणवंती ॥२॥
घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रुप तुझे ।
प्रेमे आलिंगीन, आनंदे पूजीन, भावे ओवाळीन म्हणे नामा ॥१॥
त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुध्द्यात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यद्यत सकलं परस्मै, नारायणायेति समर्पयामि ॥३॥
नमोऽस्तु अनंताय, सहस्त्रमूर्तये, सहस्त्रपादाक्षशिरोरुबाहवे, सहस्त्रनाम्ने पुरुषाय शाश्वते, सहस्त्रकोटीयुगधारणे नमः ॥
माझ्या मनाची चंचलता दूर कर.
हे सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वोत्तमा, सर्वज्ञा !
तुला ओळखण्याचे मला ज्ञान दे .
हे प्रेमसागरा, प्रेमानंदा, प्रेममूर्ते, प्रेमरूपा !
माझे दुर्गुण नाहीसे करून शुद्ध प्रेमाने हृदय भरू दे.
हे ज्ञानेशा, ज्ञानमुर्ते, ज्ञानांजना, ज्ञानज्योति !
तुझ्या चरणी माझी श्रद्धा, भक्ती द्रुढ कर.
हे मायातीता, मायबापा, मायाचालका, मायामोहहरणा !
समदृष्टी आणि अढळ शांति मला दे .
हे कमलनयना, कमलाकांता, कमलानाथा, कमलाधीशा !
माझ्या नेत्रांना सर्व स्थावर-जंगमात तुझे दर्शन घडू दे .
माझे कान तुझे कीर्तन श्रवण करू देत.
हे पतितपावना, परमेशा, परमानंदा, परमप्रिया !
माझ्या हस्ताने तुझी पूजा घडू दे.
तुझ्याभोवती माझे पाय प्रदक्षिणा घालू देत.
हे गुरुनाथा, गुरुमूर्ते, गुरुराजा, गुरुदेवा !
माझे मन निरंतर तुझे ध्यान करू दे.
तुझ्या चरणकमली मला अखंड थारा दे.
सोमवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु ...
सोमवार - सायंकाल स्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
मंगलवार - प्रातः स्मरण - उठा उठा हो वेगेसी ...
मंगलवार - सायंस्मरण - श्री गणपते | विघ्ननाशना ...
बुधवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागर ...
बुधवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ...
गुरुवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति कर ...
गुरुवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
शुक्रवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
शुक्रवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
शनिवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
शनिवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
रविवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी । हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी ॥१॥
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे । माथा शेंदूर पाझरे वरि बरे दूर्वांकुराचे तुरे ॥
माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे । गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ॥२॥
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।
ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॥
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं । भावातीतं त्रिगुणरहितं सदगुरुं तं नमामि ॥
तव भक्तिलागी तनु ही झिजू दे । तव चरणकमली मन हे निजू दे ॥
तव भजनी ठेवी ही वाचा रिझाया । नमस्कार माझा तुला गुरुराया ॥१॥
१) धन्य श्रीहरिमंदिर । आमुचे धन्य श्रीहरिमंदिर ॥धृ॥
सर्वतोमुखी एकचि चाले । हरिनामाचा गजर ॥१॥
भूलोकीचा स्वर्ग असे हा । दुःख नसे तिळभर ॥२॥
बद्धजीवांचे त्रिताप निववुनि । देई सदैव आधार ॥३॥
मुमुक्षूते निजबोध देई । व्हावया भवनदीपार ॥४॥
साधका सुलभ साधन दावी । दे शांति सत्वर ॥५॥
शरणागतांसी ब्रह्मोपदेशे । जाणविते अमर ॥६॥
ज्यापासुनि मी सुखी जाहले । असो विजय निरंतर ॥७॥
भजन - गुरुराया मजवरी करी करुणा । तुजविण शरण मी जाऊ कुणा ॥
२) उठा प्रातःकाळ झाला, आत्माराम पाहू चला ।हा समयो जरि टळला, तरि अंतरला श्रीराम ॥धृ०॥
जीव शिव दोघेजण, भरत आणि शत्रुघ्न ।
आला बंधु लक्ष्मण, मन उन्मन होउनि ॥१॥
विवेकवशिष्ठ सदगुरु, संत सज्जन मुनीश्वरु ।
करिती नामाचा गजरु, हर्षनिर्भर होउनिया ॥२॥
सात्त्विकसुमंत प्रधान, नगरवासी अवघे जन ।
आला वायुचा नंदन, श्रीचरण पहावया ॥३॥
माता जानकी बिघडली, होती प्रारब्धे लिहिली ।
तिची देहबुद्धि जाळिली, आलिंगिली श्रीरामे ॥४॥
आजची दिवाळी दसरा, पर्वकाळ आला घरा ।
रामानंदाच्या दातारा, भेटी माहेरा मज द्यावी ॥५॥
भजन - गुरुवरा सदगुरुवरा, येउंदे करुणा तुला रे मायबाप ॥
३) तुझ्या दर्शने जाहलो धन्य रामा । भक्तकैवारी आनंदधामा ॥धृ०॥काय सुंदर रघुराय तव रुप हे । माय तू आमुची, पाय दावी ।
वंदितो तव पदा, घालवी आपदा । ने मला निजपदा, पूर्णकामा ॥१॥
चरण सेवी हनुमंत पुलकित तनु । हस्तधृतशरधनु काय वानू ।
जवळी भ्राता वसे, अंकि सीता बसे । लोकमाताचि ही शरण आम्हा ॥२॥
माथि फेटा जटा, नेसी पीतापटा । रत्नमय गोमटा, कमरिपट्टा ।
मोतियांचा तुरा, माजि चमके हिरा । लाजवी मोहरा, पूर्णसोमा ॥३॥
मुक्तमाळा गळां, कस्तुरीचा टिळा । हास्यमुख सांवळा राम माझा ।
सार संसारि या, काही नाही म्हणुनि । कृष्णसुत घेई, तव गोड नामा ॥४॥
भजन - मजला उध्दरि सदगुरुनाथा श्रीगुरुनाथा, तू मायबाप दीनांचा ॥
४) भज मन, रामचरण सुखदाई ॥धृ०॥जिही चरणनसे निकसी । सुरसरी शंकर जटासमाई ।
जटाशंकरी नाम पर्यो है । त्रिभुवनतारण आई ॥१॥
जिन चरणनकी चरणपादुका । भरत रह्यो लवलाही ।
सोही चरण केवट धोय लिनो । तब हरि नाव चलाई ॥२॥
सोही चरण संतनजन सेवत । सदा रहत सुखदाई ।
सोही चरण गौतुमऋषिनारी । परसपरमपद पाई ॥३॥
दंडकवन प्रभु पावन किन्हो । ऋषिजन त्रास मिटाई ।
सो ठाकूर त्रिलोकके स्वामी । कनकमृगासंग धाई ॥४॥
कपि -सुग्रीव -बंधुभय -व्याकुल । तिन जयछत्र धराई ।
रिपुको अनुज बिभीषण निशिचर । परसत लंका पाई ॥५॥
शिवसनकादिक अरुब्रह्मादिक । शेष सहसमुख गाई ।
तुलसीदास मारुतसुतकी प्रभु । निजमुख करत बडाई ॥६॥
भजन - जगदीशा, जय जय पुराणपुरुषा । सदगुरु धाव बा ॥
५) दे पायांची जोड गुरुराया ॥धृ०॥भवदुःखे मी बहुतचि गांजलो । दावी तुझे रुप गोड ॥१॥
कल्पनासासू करी अति जाचू । सत्वरि पाय इचे तोड ॥२॥
वासनानणंदुली किती सोसू तिची बोली । एक वेळ मोडी खोड ॥३॥
कामदादुला क्षण न सोडी मला । याची कंबर मोड ॥४॥
क्रोधसासरा नेदी आसरा । त्याचे डोळे फोड ॥५॥
ममताजाऊ छी थूं करिते । जिव्हां छेदुनि सोड ॥६॥
लोभदीर मज लाथ मारितो । असे सर्वाहुनि द्वाड ॥७॥
दयाघना मज सहवेना वेदना । ह्रदयग्रंथी तोड ॥८॥
कलिमलदहना कृपा करोनि । पुरवि मनीचे कोड ॥९॥
भजन - श्रीकृष्ण चैतन्यप्रभु नित्यानंदा । हरेराम हरेकृष्ण राधेगोविंदा ॥
६) येथे का उभा श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ॥धृ०॥काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ॥१॥
काय केली सीतामाई । येथे राही रखमाबाई ॥२॥
काय केली शरयू गंगा । येथे आणिली चंद्रभागा ॥३॥
धनुष्यबाण काय केले । कर कटावरी ठेविले ॥४॥
काय केले वानरदळ । येथे मिळविले गोपाळ ॥५॥
काय केला हनुमंत । येथे उभा पुंडलिकभक्त ॥६॥
रामी रामदास भाव । जैसा भाव तैसा पंढरीराव ॥७॥
भजन - तुमबिन गुरुजी मै निराधार । अनाथ को मुझे देवोजी आधार ॥
७) संगत संतनकी कर ले । जनमका सार्थक कछु कर ले ॥धृ०॥उत्तम नरदेह पाया प्राणी । इसका हित कछु कर ले ।
सदगुरु शरण जाके बाबा । जनम -मरण दूर कर ले ॥१॥
कहांसे आया कहां जावेगा । ये कछु मालुम करना ।
दो दिनकी जिंदगानी बंदे । हुशार होकर चलना ॥२॥
कौन किसीके जोरु लडके । कौन किसीके साले ।
जबलग पल्लोमे पैसा भाई । तबलग मिठ्ठा बोले ॥३॥
कहत कबीर सुन भाई साधु । बार बार नही आना ।
अपना हित कछु कर ले बाबा । अखेर अकेला जाना ॥४॥
भजन - सच्चिदानंद कृष्ण सच्चिदानंद ॥
८) ॐ कारस्वरुपा, सदगुरुसमर्था । अनाथांच्या नाथा, तुज नमो ॥१॥गुरुरावस्वामी, आहे स्वप्रकाश । ज्यापुढे उदास, चंद्र रवि ॥२॥
वेदा पडले मौन, शास्त्रे वेडावली । वाचा हे निमाली ते श्रीगुरु ॥३॥
श्रीगुरु जयासी, पाहे कृपादृष्टी । तयासी ही सृष्टी, पांडुरंग ॥४॥
प्रभुराज, माझा, स्वामी गुरुराव । देतो मज भाव -शुद्धी भूमी ॥५॥
भूमी शुद्ध करी, ज्ञानबीज पेरी । अद्वैत हे धरी, मी तू नेणे ॥६॥
मजलागी माझी, सदगुरु माउली । कृपा करी साउली, वर्णू काय ॥७॥
एकाजनार्दनी, गुरु परब्रह्म । तयाचे पै नाम, सदा मुखी ॥८॥
भजन - चला चला रे सर्व मिळोनि श्रीहरिमंदिरी जाऊ, तेथे हरिनाम घेऊ । माळ हरिगळां वाहू ॥
९) शेवट गोड करी । गुरुराया ॥धृ०॥पंचविषयी आसक्त होउनि । बनलो मी अविचारी ॥१॥
अनन्यभक्ति दान देउनि । करी मज सुविचारी ॥२॥
तवपदकमलामोद सेवुनि । राहीन निरंतरी ॥३॥
कलिमलदहना पदरी घे दीना । तूचि माझा कैवारी ॥४॥
भजन - महाराज सिध्दारुढ माउली ॥
आरती
१) काकड आरती माझ्या प्रेमळ सिध्दा ओवाळू । अनन्यभावे शरण जाउनि आज्ञेसी पाळू ॥धृ०॥तुजविण कोणी न वाली म्हणुनि तत्पायी लोळू । गुरुचरणाच्या बळकट ध्यासे विघ्नाते टाळू ॥१॥
ओल नाही ते फोल बोलणे क्षणोक्षणी गाळू । गुरुगुण सुंदर गीत सदोदित ह्रदयात घोळू ॥२॥
सदभाव सदभक्तिचा अरि दुःसंग वगळू । सदा गुरुभजनी रत होउनि निंदास्तुति गिळू ॥३॥
अहर्निशी गुरुबोधश्रवणे द्वैतभाव कोळू । कलिमलदहनकृपामृत पिउनि निजानंदे डोलू ॥४॥
२) ओवाळू आरती माता कलावती । पहाता तुझी मूर्ति मनकामनापूर्ति ॥धृ०॥
भावे वंदिता तव दिव्य पाउले । संसारापासुनि माझे मन भंगले ॥
तुझ्या भजनी नित चित्त रंगले । झाली ह्रत्तापाची पूर्ण शांति ॥१॥
गौरवर्ण तनुवरि शोभे शुभ्र अंबर । दर्शनमात्रे लाभे आनंद थोर ॥
भाषणे सकल संशय जाती दूर । विशालाक्ष मज दे गुणवंती ॥२॥
घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रुप तुझे ।
प्रेमे आलिंगीन, आनंदे पूजीन, भावे ओवाळीन म्हणे नामा ॥१॥
त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुध्द्यात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यद्यत सकलं परस्मै, नारायणायेति समर्पयामि ॥३॥
नमोऽस्तु अनंताय, सहस्त्रमूर्तये, सहस्त्रपादाक्षशिरोरुबाहवे, सहस्त्रनाम्ने पुरुषाय शाश्वते, सहस्त्रकोटीयुगधारणे नमः ॥
विज्ञापना
हे विश्वजनका, विश्वंभरा, विश्वपालका, विश्वेश्वरा !माझ्या मनाची चंचलता दूर कर.
हे सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सर्वोत्तमा, सर्वज्ञा !
तुला ओळखण्याचे मला ज्ञान दे .
हे प्रेमसागरा, प्रेमानंदा, प्रेममूर्ते, प्रेमरूपा !
माझे दुर्गुण नाहीसे करून शुद्ध प्रेमाने हृदय भरू दे.
हे ज्ञानेशा, ज्ञानमुर्ते, ज्ञानांजना, ज्ञानज्योति !
तुझ्या चरणी माझी श्रद्धा, भक्ती द्रुढ कर.
हे मायातीता, मायबापा, मायाचालका, मायामोहहरणा !
समदृष्टी आणि अढळ शांति मला दे .
हे कमलनयना, कमलाकांता, कमलानाथा, कमलाधीशा !
माझ्या नेत्रांना सर्व स्थावर-जंगमात तुझे दर्शन घडू दे .
माझे कान तुझे कीर्तन श्रवण करू देत.
हे पतितपावना, परमेशा, परमानंदा, परमप्रिया !
माझ्या हस्ताने तुझी पूजा घडू दे.
तुझ्याभोवती माझे पाय प्रदक्षिणा घालू देत.
हे गुरुनाथा, गुरुमूर्ते, गुरुराजा, गुरुदेवा !
माझे मन निरंतर तुझे ध्यान करू दे.
तुझ्या चरणकमली मला अखंड थारा दे.
सोमवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु ...
सोमवार - सायंकाल स्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
मंगलवार - प्रातः स्मरण - उठा उठा हो वेगेसी ...
मंगलवार - सायंस्मरण - श्री गणपते | विघ्ननाशना ...
बुधवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागर ...
बुधवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ...
गुरुवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति कर ...
गुरुवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
शुक्रवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
शुक्रवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
शनिवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
शनिवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
रविवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
Comments
Post a Comment