नित्योपासना - बुधवार - सायं स्मरण
ॐ नम: शिवाय
परमपूज्य आई श्रीकलावतीदेवी |
भजन - सदगुरुनाथे माझे आई । मजला ठाव द्यावा पायी
१) सुसंगति सदा, देई मोरया । बहुत कष्टलो, कुसंगतीत या ॥१॥राग द्वेष हे, फार गांजिती । बरी नव्हे मला, यांची संगति ॥२॥
गोड वाटले, विषय सेविता । पाक विषाचा, तो नको आता ॥३॥
लक्ष्मीगणेशा, मुक्ति दे मला । उभयकरे कृष्णदास नमि तुला ॥४॥
भजन - पार्वतीच्या नंदना मोरया, गजानना गजवदना
२) किती प्रेमळ तू गुरुमाय माय माय ॥धृ०॥घेउनि मायिक । देशी स्थायिक ।
भावे वंदिता पाय पाय पाय ॥१॥
दाम न घेता । निजधाम दाविसी ।
वर्णन करु मी काय काय काय ॥२॥
अनन्यभावे तुजसी भजता ।
कलिमल दूर जाय जाय जाय ॥३॥
भजन - आनंदे गुरुमाय । निजानंदे गुरुमाय । सच्चिदानंदे गुरुमाय । पूर्णानंदे गुरुमाय
३) गुरुराया रे दावी चरण मज आता । तुजविण जगी कोण त्राता ॥धृ०॥फिरुनि चौर्यांशी लक्ष योनी । दमलो श्रमलो बहु स्वामी ।
सुख न मिळे क्षणभरि चित्ता ॥१॥
खेळी गुंतलो बाळपणी । तरुणपणी झालो कामी ।
शरिरा आली निर्बलता ॥२॥
विषयी किळस उपजेना । मन काही केल्या आवरेना ।
रात्रंदिन जाळी चिंता ॥३॥
संपत्ति असता सारे । धावती सखेसोयरे ।
ना तरी नसे कोणा वार्ता ॥४॥
व्रतनेमतपादि कराया गुंतुनि राहिलो विषयां ।
नेणुनि आपुल्या स्वहिता ॥५॥
नको नको पुनरावृत्ति । मज वाटे ही थोर आपत्ति ।
पदकमळी ठेवितो माथा ॥६॥
मी हीन दीन परदेशी । तू नाथ जगाचा होसी
तव चरण न सोडी आता ॥७॥
दहा सहांचा गुलाम बनलो । म्हणुनि तव चरण विस्मरलो ।
अपराधी थोर मी ताता ॥८॥
कलिमल दहन कराया । तूचि एक समर्थ सखया ।
स्वरुपानंद भोगवी आता ॥९॥
भजन - शांत किती हा सदगुरुमूर्ति । पाहता मावळे द्वैतभ्रांति॥
४) हे गोविंद राखो शरण अब तो जीवन हारे ॥धृ०॥नीर पीवन हेत गयो सिंधुके किनारे । सिंधु बीच बसत ग्राह चरण धरी पचारे ॥१॥
चारप्रहर युद्ध भयो ले गये मजा रे । नाक, कान डुबन लगे कृष्णको पुकारे ॥२॥
द्वारकासे खबर सुनके गरुड चढी पधारे । ग्राहको हरि मारके गजराजको उभारे ॥३॥
सूरदास मगन देख नंदको दुलारे । मेरो तेरो विचार है यमराज के द्वारे ॥४॥
भजन - सीताराम जय जय राम । हरेराम, राम, राम, राम
५) अरे मायबापा दीनदयाळा । तव भजनाचा मज लावी चाळा ॥धृ०॥सहस्त्र अपराधी मी सत्य जाण । परि देवा तुजविण क्षमा करी कोण ॥१॥
इष्ट मित्र येती देखुनि दामा । परि संकटी कोणी न येती कामा ॥२॥
हो का दुराचारी विषयी आसक्त । कृपा करोनि त्या करिसी तू मुक्त ॥३॥
तुज म्हणति कनवाळु परमकृपाळु । का ? तर करिसी तू भक्तांचा सांभाळु ॥४॥
कलिमलदहना पदरी घे दीना । कृपा करोनि पुरवी कामना ॥५॥
भजन - उपेंद्रा भक्तचकोरचंद्रा । सत्वरि धाव बा
६) होशिल फारचि मोठा रे । तरी होईल फारचि तोटा रे ।होशिल गुरुचा बेटा रे । तरी होशिल फारचि छोटा रे ॥१॥
राहशिल नर्मदेचा गोटा रे । तरी यमचि मारील सोटा रे ।
कळेल मोहचि खोटा रे । तरी कळेल सदगुरु मोठा रे ॥२॥
देशिल विषयां फाटा रे । तरी जाईल जन्माचा काटा रे ।
सदगुरु जरी पाठिराखा रे । तरी होशिल पुण्याचा साठा रे ॥३॥
स्मरशिल रुक्मिणीवरु रे । तरी तरशिल भवसागरु रे ।
होशिल जगती थोरु रे ।
हे सांगे एक सदगुरु रे ॥४॥
भजन - ॐ
नमःशिवाय, तरणोपाय,
सुलभ उपाय, तारकमंत्र गुरुंचा
७) श्रीकृष्ण कहे निरधारा । सुन अरजुन बचन हमारा ॥धृ॥ यह जीव सदा अविनाशी । सुखरुप स्वयंपरकाशी ।
जड देहको चेतनहारा ॥सु०॥१॥
जिम वस्त्र पुरान उतारी । पहने नवीन नरनारी ।
तिम जीव शरीर दुबारा ॥सु०॥२॥
मणिका जिम दोर अधारे । तिम सब जग मोर सहारे ।
मम अंश जीव ये सारा ॥सु०॥३॥
यह नश्वर तन स्थिर नही । क्या सोच करे मनवाही ।
ब्रह्मानंद है रुप तुम्हारा ॥सु०॥४॥
भजन -
बेळगांव शहरी अनगोळमाळी श्रीहरिमंदिरात
तेथे हरि प्रत्यक्ष नांदतो काय सांगू मात ॥१॥
हरिनामाचा गजर होतो तेथे दिनरात ।
बंधुभगिनी सर्व मिळोनि अमोघ लाभ घेत ॥२॥
आमुचा हरि कृपादृष्टीने आम्हाकडे पहात ।
पाप ताप दुःख संकटे हरिला भिउनि पळत ॥३॥
८) सदगुरुसारिखा, सोयरा जिवलग । तोडिला उद्वेग, संसाराचा ॥१॥काय उतराई, होऊ कवण्या गुणे । जन्मा नाही येणे, ऐसे केले ॥२॥
माझे सुख मज, दाखविले डोळां । दिधली प्रेमकळा, नाममुद्रा ॥३॥
डोळियांचा डोळा, उघडिला जेणे । स्वानंदाचे लेणे, लेवविले ॥४॥
बहुत जन्मीचे, फेडिले साकडे । कैवल्य रोकडे, दाखविले ॥५॥
नामा म्हणे निक्की, सापडली सोय । न विसंबे पाय, खेचराचे ॥६॥
भजन - सदगुरुमाय दाखवि पाय । तुजविण गमेना करु मी काय ॥
अर्जी
गुरुराया तव चरणदास मी अर्जी ऐकावी । दयाळा, अर्जी ऐकावी ॥धृ०॥मी अनाथ मज सनाथ करुनि लज्जा रक्षावी ।
दयाळा, उपेक्षा नसावी । चाल ।
तवपदकमली अनन्यभक्ति सतत दृढसावी ।
दयाळा, सतत दृढसावी ॥१॥
विषयसुखाची इच्छा कदापि न मला स्पर्शावी ।
दयाळा, न मला स्पर्शावी ।
तव दिव्य ज्ञान बोधामृती मम मति घर्षावी ।
दयाळा, मम मति घर्षावी । चाल ।
तुजवाचुनिया अन्य दैवते कधी नच नवसावी ।
दयाळा, कधी नच नवसावी ॥२॥
मी माझे ही द्वैतबुद्धि स्वप्नी न वसावी ।
दयाळा, स्वप्नी न वसावी ।
स्वस्वरुपाचा अनुभव देउनि भ्रांति निरसावी ।
दयाळा, भ्रांति निरसावी । चाल ।
कलिमलदहना परमपावना तव कृपा ऐसावी ।
दयाळा, तव कृपा ऐसावी ॥३॥
भजन - जय जय पांडुरंग हरि ॥
आरती
१) आरती अनंता जय जय । आरती अनंता ॥धृ०॥अनंत तव रुप, अनंत तव गुण । विधिहरिहरताता ॥१॥
अनंत तव नाम, अनंत तव प्रेम । तूचि कर्ताहर्ता ॥२॥
अनंत तव पद, अनंत तव कर । तारिसी तू भक्तां ॥३॥
अनंत श्रवण, अनंत नयन । काळाचा हंता ॥४॥
कलिमलदहना, सगुणनिर्गुणा । तूचि गुरुसमर्था ॥५॥
२) आरती गुरुमाई । मस्तक ठेविते पायी ॥धृ०॥
कलियुगी अवतरोनी । श्रीहरिमंदिरात ।
कलावती या नामे । प्रगटलीस आई ॥१॥
गौरवर्ण काया । सुहास्यवदन ।
शांत मूर्ति पाहता ।मन तल्लीन होई ॥२॥
चतुर्विध भक्त येती । त्यावरि समान प्रीति ।
अज्ञान निरसुनिया । देसी आनंद आई ॥३॥
भवताप निवारोनी । सुखविसी सकला ।
म्हणुनि दीन विजया । शरण आली असे पायी॥४॥
घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रुप तुझे ।
प्रेमे आलिंगीन, आनंदे पूजीन, भावे ओवाळीन म्हणे नामा ॥१॥
त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव ॥२॥
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, बुध्द्यात्मना वा प्रकृतिस्वभावात।
करोमि यद्यत सकलं परस्म, नारायणायेति समर्पयामि ॥३॥
ॐ चैतन्यं शाश्वतं शांतं व्योमातीतं निरंजनम ।
नादबिंदुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः । गुरवे नमः । गुरवे नमः ॥
गुरुपादुकाष्टक
दयावंत कृपावंत सद्गुरुराया | अनन्यभावे शरण आलो मी पाया | भवभ्रमातुनि काढी त्वरे या दीनासी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |१|अनंत अपराधी मी सत्य आहे | म्हणोनि तुझा दास होऊ इच्छिताहे | तुजविण हे दुःख सांगू कुणासी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |२|
मतिहीन परदेशी मी एक आहे | तुजविण जगी कोणी प्रेमे न पाहे | जननी जनक इष्ट बंधु तू मजसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |३|
जगतपसारा दिसो सर्व वाव | अखंडीत तव पायी मज देई ठाव | विषापरि विषय वाटो मनासी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |४|
तव आज्ञेसी पाळील जो एकभावे | तयासीच तू भेट देसी स्वभावे | म्हणोनि अनन्यशरण आलो मी तुजसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |५|
किती दिवस गाऊ हे संसारगाणे | तुजविण कोण हे चुकविल पेणे | नको दूर लोटू चरणी थारा दे मजसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |६|
सुवार्णासी सोडुनी कांति न राही | सुमनासी न सोडी सुवास पाही| तैसा मी राहीन निरंतर तुझ्या सेवेसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |७|
कलावंत भगवंत अनंत देवा | मनकामना पुरवि दे अखंड तव भक्तिमेवा | कृपा करोनि मज ठेवी स्वदेशी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |८|
सोमवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु ...
सोमवार - सायंकाल स्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
मंगलवार - प्रातः स्मरण - उठा उठा हो वेगेसी ...
मंगलवार - सायंस्मरण - श्री गणपते | विघ्ननाशना ...
बुधवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागर ...
गुरुवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति कर ...
गुरुवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
शुक्रवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
शुक्रवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
शनिवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
शनिवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
रविवार - प्रातः स्मरण - प्रारंभी विनंति करु गणपती विद्यादयासागरा ...
रविवार - सायंस्मरण - सदगुरुनाथे माझे आई ...
Comments
Post a Comment